भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (27 ऑगस्ट) आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली. पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद व्हीव्हीएस लक्ष्मण तर महिला संघाचे अंतरिम प्रशिक्षकपद माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर हे भूषवतील. मात्र, असे असले तरी महिला संघाला मागील नऊ महिन्यांपासून अधिकृत मुख्य प्रशिक्षण मिळाला नसल्याचे दिसते.
भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले रमेश पोवार मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमी फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यानंतर भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने जाहिरात काढली नाही.
भारतीय संघाने या काळात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा खेळल्या. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. बांगलादेशने मायदेशातील ही मालिका बरोबरीत ठेवण्यात यश मिळवले. या सर्व दौऱ्यांवेळी अंतरिम प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश कानिटकर भारतीय संघासोबत होते. मात्र, अधिकृतपणे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना मान्यता नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आता मी डिसेंबर महिन्यापर्यंत भारतीय महिला संघाला मुख्य प्रशिक्षक मिळण्याची शक्यता कमी आहे.
हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाची अव्वल चार क्रिकेट संघांमध्ये गणना केली जाते. भारताला 2022 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयश आलेले. त्यानंतर भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला. तर, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत पराभूत झालेला.
(Indian Womens Cricket Team Have No Head Coach Since Last 9 Months Hrishikesh Kanitkar As Interim Coach)
महत्वाच्या बातम्या-
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य
बोंबला! World Cup 2023 तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश, भारतीय सामन्यांची बुकिंग कधी?