---Advertisement---

बोंबला! World Cup 2023 तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश, भारतीय सामन्यांची बुकिंग कधी?

ICC-World-Cup-2023-Trophy
---Advertisement---

भारतात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा खूपच मोठे गिफ्ट आहे की, यावेळी क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यातील सर्व सामन्यांचे आयोजन फक्त आणि फक्त भारतातच होणार आहे. या स्पर्धेसाठी 10 ठिकाणे निवडली गेली आहे. यातील 1 शहर सोडून भारत इतर 9 ठिकाणी आपले सामने खेळणार आहे. अशात तिकिटांसाठी भारतीय चाहते खूपच उत्सुक झाले असतील. या स्पर्धेसाठीच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे. तसेच शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) पहिल्या दिवशीच बुकिंगदरम्यान वेबसाईट क्रॅश झाल्याची बातमी समोर येत आहे.

तब्बल ‘एवढा’ वेळ बंद होती वेबसाईट
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेसाठीच्या तिकिटांची विक्री 25 ऑगस्टपासून सुरू झाली. मात्र, अधिकृत वेबसाईट 35 ते 40 मिनिटे क्रॅश झाली होती. यादरम्यान ऍप आणि वेबसाईट व्यवस्थित काम करत नसल्याने क्रिकेटप्रेमींना तिकीटे बुक करण्यात खूपच अडचण निर्माण झाली. बऱ्याच वेळानंतर तिकीट विक्री सुरू झाली. पहिल्या दिवशी फक्त त्याच सामन्यांच्या तिकिटांची विक्री होती, ज्यात भारत खेळणार नाही. मात्र, ही प्रक्रिया स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजता सुरू झाली आणि नंतर चाहत्यांनी ‘बुक माय शो’ (Book My Show) ऍप क्रॅश झाल्याची तक्रार केली. खरं तर, बुक माय शो ही ऍप विश्वचषकासाठी तिकीट पार्टनर आहे.

चाहते निराश
दिल्लीच्या एका क्रिकेटप्रेमीच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, “हे वास्तवात निराशाजनक आहे. तिकीट विक्रीची घोषणा इतकी उशिरा झाली आणि त्यानंतरही कोणतेच सिस्टम नाहीये, त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसीची प्रतिमा मलिन होते. जगभरात अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यासाठी लॉटरी आणि तिकीट रांगांसारखी सुविधा खूपच सामान्य आहे. मात्र, तिकीट विक्रीच्या नियोजित वेळेच्या अर्ध्या तासानंतर वेबसाईट सुरळीत सुरू झाली, पण तोपर्यंत अनेक चाहत्यांचा संयम सुटला होता.

ऑनलाईन तिकीटे कशी करायची बुक?
विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय सामन्यांची तिकीटे 29 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ऑनलाईन तिकीटे बुक करता येतील. तसेच, उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकीटे 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उपलब्ध असतील. अशाप्रकारे, क्रिकेटप्रेमी विश्वचषकाची तिकीटे ऑनलाईन बुक करू शकतात.

स्पर्धेसाठीची ठिकाणं
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. तसेच, भारतीय संघ स्पर्धेचे अभियान 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापासून सुरू करणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील सामने एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, धरमशाला, पुणे आणि कोलकाता यांचा समावेश आहे. भारतीय संघ फक्त हैदराबादमध्ये खेळणार नसून इतर 9 ठिकाणी खेळणार आहे. (world cup 2023 tickets booking starts book my show app crashed on first day read here)

हेही वाचा-
अर्रर्र…! संघाच्या अध्यक्षानेच महिला फुटबॉल खेळाडूला सर्वांदेखत केलं किस, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ
फलंदाजीमध्ये 99.94ची जबरदस्त सरासरी असलेल्या ‘डॉन’ला इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाने दिलेला सर्वाधिक त्रास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---