---Advertisement---

भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका

On: बुधवार, फेब्रुवारी 24, 2021 7:54 PM
---Advertisement---

दीर्घ काळानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ लवकरच मैदानावर परतणार आहे. कोरोना व्हायरस नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ पुनरागमन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात ते मालिका खेळतील. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची ही मालिका मर्यादित षटकांच्या स्वरूपात खेळवली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौच्या स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील.

माध्यमांमधील वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारत दौऱ्यावर पाच वनडे आणि तीन टी-२० सामने खेळतील. याआधी या मालिकेचे आयोजन केरळमध्ये होणार होते. मात्र केरळ क्रिकेट संघटनेने असमर्थतता व्यक्त केल्याने आता उत्तर प्रदेशला आयोजनाची संधी मिळेल.

याबाबत बोलताना उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे वरिष्ठ अधिकारी श्रेयांश कार्तिकेय म्हणाले, “उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील मालिकेच्या आयोजनाची संधी मिळाली असल्याचे वृत्त खरे आहे. पाच वनडे आणि तीन टी-२० असे आठही सामने लखनौच्याच मैदानावर खेळवले जातील.

या मालिकेसाठी दोन्ही संघ तयार असून मालिकेच्या कार्यक्रमाची रूपरेषाही आखून तयार असल्याचे समजते. येत्या ७ मार्चपासून या मालिकेला सुरुवात होऊ शकते. अनुक्रमे ७, १०, १२, १४ आणि १७ मार्च रोजी वनडे सामने खेळवले जातील. त्याचवेळी तीन टी-२० सामने अनुक्रमे २०, २२ आणि २४ मार्चला आयोजित केले जातील.

या मालिकेच्या आयोजनाची अधिकृत घोषणा बीसीसीआय लवकरच करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघही याच आठवड्यात भारतात दाखल होईल. याच दरम्यान देशांतर्गत महिला क्रिकेटलाही लवकरात लवकर प्रारंभ करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. विजय हजारे ट्रॉफीनंतर महिला क्रिकेटला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

द्विशतक आणि २४ फेब्रुवारीचा आहे याराना

शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय; पाहा कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडू खेळलेत १०० कसोटी सामने

Ind vs Eng : यजमानांच्या तिखट माऱ्यासमोर पाहुण्यांची त्रेधातिरपीट, नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---