भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियममध्ये शनिवारी (२० मार्च) ३ टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकन महिला संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघातील अष्टपैलू खेळाडूने महत्वाची भूमिका बजावली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकन महिला संघाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. भारतीय महिला फलंदाजांनी २० षटकाअखेर ६ बाद १३० धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिकेसमोर १३१ धावांचे आव्हान दिले होते.
या धावांचा पाठलाग करताना एनी बॉश हिने अष्टपैलू कामगिरी करत ४८ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. तसेच त्यापूर्वी गोलंदाजी करताना तिने २ महत्वपूर्ण गडी देखील बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन महिला संघाने ८ गडी राखून विजय मिळवला.
हर्लिन देओलचे अर्धशतक
प्रथम फलंदाजी करत असताना स्मृती मंधाना ११ धावा करत माघारी परतली. तर शेफाली वर्माने २२ चेंडूत २२ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून हर्लिन देओलने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तसेच जेमिमा रोड्रिग्वेज ने २७ चेंडूत ३ चौकार मारत ३० धावांचे बहुमूल्य योगदान दिले. त्यामुळे भारताला २० षटकात ६ बाद १३० धावा करता आल्या.
प्रतिउत्तरादाखल १३१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकन महिला संघातील खेळाडूंना चांगली सुरुवात करता आली नाही. अवघ्या १४ धावांवर त्यांची पहिली विकेट पडली होती. पण त्यांनतर बॉश आणि सून लुस यांच्यामध्ये ९० धावांची भागीदारी झाली. बॉश ६६ धावा करत माघारी परतली. तर लुसने ४३ धावा करत दक्षिण आफ्रिकन महिला संघाला सामना जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ कोहलीचा नवा विश्वविक्रम! केन विलियम्सनला मागे टाकल मिळवले पहिले स्थान
मालिका विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरून दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
विराट जेथे विक्रम तेथे! नाबाद ८० धावांची खेळी करत विराटने केली रोहितच्या या विश्वविक्रमाची बरोबरी