टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंगला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला. अशातच आता कुस्तीतूनही आनंदाची बातमी येत आहे. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानोला १३-२ ने एकतर्फी विजय मिळवला. यासह त्याने उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला आहे.
या सामन्यात पहिल्या राऊंडमध्ये रवीने जबरदस्त कामगिरी करत ३-२ ने विजय मिळवला. त्यानंतर त्याने दुसऱ्या राऊंडमध्ये सलग गुण घेत थेट १० ची आघाडी घेतली. (Indian wrestler Ravi Kumar Dahiya beats Oscar Tigreros of Colombia to move into quarters of men’s freestyle (57kg))
https://twitter.com/Media_SAI/status/1422754387500277760
उपांत्यपूर्व सामन्यात रवी बल्गेरियाच्या व्हॅलेंटिनोव्ह जॉर्जी वांगेलोव्हशी भिडणार आहे.
रवीने उपांत्यपूर्व सामन्यात माजी जागतिक चॅम्पियन आणि २०१७ चा आशियाई चॅम्पियन जपानच्या यूकी ताकाहाशीला ६-१ ने पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. तरीही, त्याला उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे पठ्ठ्या! भालाफेक खेळातून इंडियाला पदकाची आशा, नीरज चोप्राने मिळवलं फायनलचं तिकीट
पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर
टोकियो ऑलिंपिक्स: सोशल मीडियावर व्हायरल होणारी ‘ही’ देखणी मुलगी आहे तरी कोण? वेधलंय सर्वांचं लक्ष






