---Advertisement---

जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 9:35 AM
---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तिला या सामन्यात पराभूत व्हावे लागले. असे असले तरीही, तिला कांस्य पदकाचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. तिच्याकडून कांस्य पदकाच्या आशा अजूनही कायम आहेत.

महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात विनेश फोगट आणि बेलारूसची वनेसा कलाडझिंस्काया आमने सामने होते. या सामन्यात जागतिक अव्वल क्रमांकाच्या विनेशला वनेसाने ३-९ ने पराभूत केले. खरं तर दुसऱ्या राऊंडमध्ये वनेसाने विनेशला चितपट करून ‘विनर बाय फॉल’ अंतर्गत सामना खिशात घातला. (Indian wrestler Vinesh Phogat (53kg) loses to Belarus’ Vanesa Kaladzinskaya in quarterfinals of Olympic Games)

सुरुवातीला विनेश २-५ ने पिछाडीवर होती. मात्र, त्यानंतर तिने एक गुण मिळवला आणि स्कोर ३-५ असा केला. त्यानंतर मात्र, वनेसाने  दमदार खेळ दाखवत मोठी आघाडी घेतली आणि स्कोर ९-३ असा केला. त्यामुळे विनेशला पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र, तिच्याकडे अद्याप पदक जिंकण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी वनेसाला अंतिम फेरी गाठावी लागेल. त्यानंतरच विनेश रेपचेज राऊंडमार्फत कांस्य पदक जिंकू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

-चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक

-बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना

-शिवपाल सिंगचं फायनलचं तिकीट हुकलं; भालाफेकीत दोन्ही ग्रूपमधील ऍथलिट पार करू शकले नाहीत नीरजचे अंतर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---