जागतिक कुस्ती महासंघाने गुरुवारी (24 ऑगस्ट) भारतीय कुस्ती महासंघाविरोधात मोठे पाऊल उचलले. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकांबाबत बेगवेगळ्या बातम्या आणि प्रकरणे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत आणि जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन झाल्यामुळे कुस्तीपटूंना याचा फटका बसणार आहे. कुस्तीपटूंना या कारवाईमुळे आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू आपल्या देशाच्या झेंड्यासह खेळू शकणार नाहीत. 16 सप्टेंबरपासून ऑलिम्पिक पात्रतेसाठी वर्ल्ड चॅम्पिनशिप स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेतही भारतीय कुस्तीपटू सटस्थ झेंड्यासह खेळताना दिसू शकतात.
काय आहे बृजभुषन सिंग प्रकरण?
मागच्या काही महिन्यांपूर्वी भारतीय महिला कुस्तीपटूंकडून तत्कालीन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरन सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. चार महिने चाललेल्या आंदोलनानंतर बृजभुषण यांना आपल्या पदावरून निलंबित केले गेले. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक अधिकारी म्हणून जम्मू-कश्मीरचे माजी न्यायाधीश एमएस कुमार यांची नियुक्ती केली गेली. 11 जुलै रोजी निवडणूक ठरली होती. मात्र, आसाम कुस्ती महासंघाने यासाठी मान्यता न देता उच्च न्यायालय निवडणुकीच्या स्थिकीतीच मागणी केली. त्यांची ही मागणी मान्य देखील केली गेली.
त्यानंतर निवडणूक आधिकारी एमएस कुमार यांनी निवडणुकीसाठी 12 ऑगस्ट ही दुसरी तारीख ठरवली. पण यावेळीही निवडणूक होऊ शकली नाही. कारण एक दिवस आधी हरियाणा कुस्ती महासंघाचे काही अधिकारी हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि निवडणूक पुन्हा स्थगित झाली. माहितीनुसार जागतिक कुस्ती महासंघाकडून मे 2023मध्ये भारतीय कुस्ती महासंघाला पत्र मिळाले होते. यामध्ये त्या 45 दिवसांमध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूका घेण्याबाबत सुचना केल्या गेल्या होत्या. जर निवडणुका झाल्या नाहीत, तर जागतिक कुस्ती महासंघाकडून निलंबन केले जाईल, असे स्पष्ट सांगितले गेले होते. पण तरीदेखील भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत. (Indian Wrestling Federation suspended by United World Wrestling)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023पूर्वी रोहितचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘ऍटिट्यूड तर असा आहे…’
नेमार ज्युनियर पहिल्यांदाच भारतात! मुंबई सिटी एफसीसोबत करणार दोन हात