Asia Cup 2023पूर्वी रोहितचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘ऍटिट्यूड तर असा आहे…’

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बहुप्रतिक्षित आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. या स्पर्धेत भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली किताब जिंकण्यासाठी उतरणार आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. लवकरच संघ श्रीलंकेला रवाना होईल. त्यापूर्वी अनेक भारतीय खेळाडू एनसीएमध्ये पोहोचले आहेत. अशात भारतीय कर्णधाराचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘आशिया चषक जिंकणार
रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचे सांगितले जात आहे. रोहितव्यतिरिक्त विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनही मुंबई विमानतळाहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. रोहित विमानतळाच्या आत जात असताना पॅपराजी त्याला म्हणतात की, “आशिया चषकाची प्रतीक्षा आहे.” यावर भारतीय कर्णधार थम्प्स अप करतो. त्यानंतर रोहित हसत हसत म्हणतो की, “जिंकणार, जिंकणार.” कर्णधाराचा हा आत्मविश्वास चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. या व्हिडिओवर नेटकरी म्हणत आहेत की, “भावाने म्हटलंय ना जिंकणार तर आपणच.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “ऍटिट्यूड तर असा दाखवत आहे, जसा की हिटमॅन आहे.”
https://www.instagram.com/p/CwRwh_ZqVyT/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
रोहितच्या नेतृत्वात जिंकला आशिया चषक
भारतीय संघाने अखेरचा आशिया चषक 2018मध्ये जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच होते. विराट कोहली (Virat Kohli) याने आशिया चषकातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उपकर्णधार रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ स्पर्धेत भाग घेण्यासाठी यूएईला पोहोचला होता. पाकिस्तानला दोन सामन्यात पराभूत करून भारताने अंतिम सामन्यातही पोहोचू दिले नव्हते. त्यामुळे भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा सामना केला होता. हा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला होता.
पाकिस्तानशी भिडणार भारत
भारतीय संघ आशिया चषकातील आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारताला 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध भिडायचे आहे. हे दोन्ही सामने पल्लेकले येथे खेळले जाणार आहेत. जर भारत आणि पाकिस्तानला सुपर-4मध्ये एन्ट्री मिळाली, तर 10 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. सुपर-4मध्ये भारताला 12 आणि 15 सप्टेंबरलाही सामना खेळावा लागेल. 13 सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. (indian skipper rohit sharma confident winning asia cup 2023 mumbai airport)
हेही वाचा-
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केले विराटचे तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘विश्वचषकात त्याचा सामना करणे…’
तो फॉर्ममध्ये परतला! श्रेयसने सराव सामन्यात चोपल्या ‘एवढ्या’ धावा, Asia Cupमध्ये काढणार पाकिस्तानचा घाम