भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दोन दिवस खेळून तब्बल 480 धावांचा डोंगर उभा केला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा याने खास विक्रमाची नोंद केली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 480 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाकडून दोन फलंदाजांनी शतक ठोकले. त्यात उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमरून ग्रीन (114) यांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिली विकेट रोहित शर्मा (35) याच्या रूपात 74 धावांवर गमावली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) फलंदाजीला उतरला. पुजाराने यावेळी 27व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा करत वैयक्तिक 10 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे त्याच्या नावावर दमदार विक्रमाची नोंद झाली.
Milestone Alert 🚨@cheteshwar1 completes 2⃣0⃣0⃣0⃣ Test runs against Australia 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/c0YZL3j0yj
— BCCI (@BCCI) March 11, 2023
पुजाराचा विक्रम
चेतेश्वर पुजाराने केलेल्या या धावांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावांचा टप्पा पार केला. भारताच्या पहिल्या डावात लंचपर्यंत 37 षटकांनंतर पुजाराने नाबाद 22 धावा केल्या. अशाप्रकारे त्याच्या 2011 धावा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने 3630 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) असून त्याने 2434 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त 2143 धावांसह राहुल द्रविड (Rahul Dravid) तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पुजाराकडे द्रविडच्या 2143 धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. तसेच, भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 1793 धावांसह पाचव्या स्थानी आहे. (Indians with most test runs against Australia cheteshwar pujara 4th in the list)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय
3630 धावा- सचिन तेंडुलकर
2434 – व्हीव्हीएस लक्ष्मण
2143 – राहुल द्रविड
2000 – चेतेश्वर पुजारा*
1793 – विराट कोहली
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापाची छाती गर्वाने फुगली! कर्णधार बनताच बावुमाने ठोकले पहिले शतक, वडिलांकडून टाळ्यांचा कडकडाट; Video
सलग चौथ्या लाजीरवाण्या पराभवानंतर स्मृती मंधानाची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्वत:ला ठरवले दोषी; म्हणाली…