---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर

Indian-Cricket-Team
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब कोण जिंकणार याचा निर्णय रविवार 9 मार्च रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. तसेच विराट कोहली यामध्ये सर्वात जास्त धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील टॉप 10 खेळाडू ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

विराट कोहली (746)
विराट कोहली फक्त या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हंगामात भारतासाठी सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. जगाच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर क्रिस गेल आहे. कोळीच्या नावावर 17 सामन्यात 16 डावात 746 धावा आहेत यामध्ये 1 शतक तर सहा अर्धशतके आहेत.

शिखर धवन (665)
गब्बर नावाने मशहूर असलेला माजी क्रिकेटर शिखर धवन या यादीत भारतामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दहा सामन्यांच्या दहा डावात 701 धावा केल्या आहेत. त्यातील त्याचा सर्वोत्तम स्कोर 125 आहे. यादरम्यान त्याने तीन शतक आणि तीन अर्धशतक केले आहेत.

सौरव गांगुली (627)
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारे तिसरे भारतीय आहेत. त्यांनी 13 सामन्यातील 11 डावात 665 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे त्यातील त्यांच्या सर्वोत्तम स्कोर 141 धावांचा आहे.

राहुल द्रविड (627)
चौथ्या स्थानी राहुल द्रविड आहेत. त्यांनी 19 सामन्यात 15 डावात 627 केल्या आहे. द्रविड यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 6 अर्धशतक ठोकले आहेत. त्यामध्ये कोणतेही शतक नाही.

रोहित शर्मा (585)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा कडे आहे आणि रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानी आहे. अंतिम सामन्यात जर रोहित काही प्रभावी कामगिरी करू शकला तर तो या यादीत वरच्या स्थानी येऊ शकतो. रोहितने 14 डावात 585 धावा केल्या आहेत. त्यातील त्याचा सर्वोत्तम स्कोर 123 धावा आहेत. त्याने एक शतक आणि चार अर्धशतक ठोकले आहेत.

सचिन तेंडुलकर (441)
सचिन तेंडुलकर यांनी 16 सामन्यातील 14 डावात 441 धावा केल्या आहेत. स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम पारी 141 धावांची खेळली होती. त्यांनी एक शतक आणि एक अर्धशतक केले होते.

वीरेंद्र सेहवाग (389)
विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 10 सामन्यात 10 डावात 389 धावा केल्या आहेत. एका पारीमध्ये त्यांचा सर्वोत्तम स्कोर 126 धावांचा आहे. त्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

युवराज सिंग (376)
युवराज सिंग यांनी 18 सामन्यातील 13 डावात 376 धावा केल्या आहेत. युवराज यांनी तीन अर्धशतके केली आहेत. त्यांच्या नावावर या स्पर्धेत कोणतंही शतक नाही.

मोहम्मद कैफ (236)
मोहम्मद कैफ यांनी 8 सामन्यातील 5 डावात 236 धावा केल्या आहेत यामध्ये एक शतक सामील आहे.

श्रेयस अय्यर (195)
श्रेयस अय्यर या यादीमध्ये 10 व्या स्थानी आहे. तसेच त्याची चॅम्पियन्स ट्रॉफी ही पहिली स्पर्धा आहे. त्याने चार डावात 195 धावा केल्या आहेत.

हेही वाचा 

सौरव गांगुलींच 20 वर्षांपूर्वीच रेकॉर्ड भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात मोडणार का हार्दिक पांड्या?

नेटकऱ्यांनी केली मोहम्मद शमी आणि हाशिम अमला यांची बरोबरी! यामागे नेमके कारण काय?

भारताविरुद्ध सौद शकीलची अर्धशतकी खेळी,पण आता या कारणाने ट्रोलर्सच्या‌ निशाण्यावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---