आज (22 जानेवारी) ब्लोएमफोंटेन येथे 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकात (ICC World Cup) भारत विरुद्ध जपान (India vs Japan) संघात सामना पार पडला. हा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला (Won by 10 Wickets) आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जपानने 22.5 षटकात सर्वबाद 41 धावा केल्या. यामध्ये 19 धावा भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अतिरिक्त दिल्या.
जपानकडून फलंदाजी करताना केंटो ओटा डोबेल (Kento Ota Dobell) आणि शु नोगुचीने (Shu Noguchi) प्रत्येकी 7 धावा केल्या. तर मॅक्स क्लेमेंट्सने (Max Clements) 5 धावा केल्या. तर कर्णधार मार्कस थरगेटसोबत (Marcus Thurgate) इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी (3), आकाश सिंग (2) आणि विद्याधर पाटीलने (1) विकेट्स घेतल्या.
यानंतर जपानने दिलेल्या 42 धावांचे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या 4.5 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.
भारताकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने 18 चेंडूत सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. तर कुमार कुशग्रने नाबाद 13 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.
आयसीसीने घातलेल्या बंदीबद्दल कागिसो रबाडा म्हणाला…
वाचा👉https://t.co/PEnmjpONyC👈#म #मराठी #Cricket #SAvENG @KagisoRabada25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020
टीम इंडियाला मोठा धक्का! हा मोठा खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेतून बाहेर
वाचा👉https://t.co/MvmF8ujdSS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020