---Advertisement---

भरवशाचे फलंदाज फॉर्मात नसूनही ‘ही’ घोडचूक कशी केली? दिग्गजाने कोहली अन् शास्त्रींचा फटकारले

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 12:10 AM
Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू झाला आहे. यापूर्वी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर दमदार विजय मिळवला होता, ज्यामुळे भारतीय संघाने ०-१ ने आघाडी मिळवली. तिसरा कसोटी सामना देखील जिंकून भारतीय संघ ही आघाडी अशीच कायम ठेवतील अशी आशा होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन करत भारतीय संघाला ७८ धावात गुंडाळले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथमच इंग्लंडमध्ये नाणेफेक जिंकली होती. कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोहलीचा हा निर्णय चुकल्याचे सुरुवातीच्या काही वेळातच समजून आले. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. त्यामुळे कोहलीच्या या निर्णयावर सगळीकडून टीका केली जात होती.

यातच आता भारताचा माजी गोलंदाज मनिंदर सिंगने विराट कोहली आणि रवी शास्त्री दोघांनाही यावरून फटकारले आहे.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ सोबत बोलताना मनिंदर म्हणाले, “स्टुअर्ट ब्रॉडने देखील याबाबतीत ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते, की सुरुवातीचे केवळ ४ तासच लीड्समध्ये चेंडू सीम होतो. ज्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तीच सगळ्यात चांगली वेळ असते. नाणेफेक जिंकून तुम्ही प्रथम फलंदाजी करावी हे माझे देखील मत होते. मात्र तुम्हाला तिथली परिस्थिती देखील पहाणे गरजेचे होते. त्यावेळी तेथील वातावरणात प्रचंड ढगाळ होते.”

“मला एवढेच म्हणायचे आहे की, विराट कोहली जो एवढा अनुभवी खेळाडू आहे. त्याचसोबत रवी शास्त्री जे १९८६ साली या मैदानात खेळले होते आणि जिंकले देखील होते. मग ते एवढी मोठी चूक कशी करू शकतात? तेही अशा परिस्थितीत ज्यावेळेस तुमचे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि खुद्द कर्णधार कोहली यांसारखे विश्वासातील फलंदाज खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे माझ्या मते नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करायला हवी होती,” असेही पुढे बोलताना मनिंदर म्हणाला.

दरम्यान, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र चांगलेच पुनरागमन केले. नाणेफेक हरल्यानंतर गोलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने भारतीय संघाची चांगलीच नाचक्की केली. भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ ७८ धावांमध्ये गुंडाळले. ज्यामध्ये सर्वाधिक ३-३ विकेट्स जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटोन यांनी घेतली. त्यानंतर सॅम करन आणि ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंडच्या सलामीवीराचे टी२०त नाबाद शतक, चक्क १६४ धावांनी जर्मनीला चारली धूळ
काय सांगता? ३७.५० कोटी देऊन खरेदी केलेले ‘हे’ क्रिकेटर दुसऱ्या टप्प्यातून बाहेर; बघा यादी
२०२१ मध्ये फक्त रूटचाच डंका! धावांच्या बाबतीत आसपासही नाही कोणता फलंदाज, पाहा आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---