भारताला टोकिया ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटात अपयशाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि हाँगकाँग संघात झालेल्या टेबल टेनिसच्या पुरुष एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये भारताचा स्टार टेबल टेनिसपटू जी साथियानला पराभव पत्करावा लागला आहे. हाँगकाँगच्या लॅम सिउ हँगने जी साथियानला ४-३ ने धूळ चारत पुढील राऊंडमधील आपले स्थान पक्के केले आहे.
G Sathiyan goes down to HS Lam of Hong Kong after battling on for seven sets in their men's singles #tabletennis encounter.#Tokyo2020
— SAI Media (@Media_SAI) July 25, 2021
या सामन्यात सुरुवातीला साथियानने ३-१ अशी आघाडी कायम ठेवली होती. मात्र, शेवटचे ३ सेट त्याने गमावले. (India’s Gnanasekaran Sathiyan loses to Hong Kong’s Lam Siu Hang in second round In Tokyo Olympic)
#TeamIndia | #Tokyo2020 | #TableTennis
Men's Singles Round 2 ResultsA thrilling encounter saw Sathiyan go down against Hang Sui, who made great comeback! What an #Olympics debut champ @sathiyantt 👏 We'll be back #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/5fSoKM4PiP
— Team India (@WeAreTeamIndia) July 25, 2021
या सामन्यात जागतिक क्रमवारीतील ९५ क्रमांकाच्या लॅम सिउ हँगने साथियानला ४-३ ने (११-७, ७-११, ४-११, ५-११, ११-९, १२-१०, ११-६) पराभूत केले.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ