पॅरिस पॅरालिम्पिकचा सहावा दिवस भारतासाठी शानदार ठरला. भारतीय खेळाडूंनी उंच उडी, भालाफेक आणि 400 मीटर शर्यतीत एकूण 5 पदके जिंकली. भारताने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 20 पदके (3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य) जिंकली आहेत. खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमधील 19 पदकांची संख्या मागे टाकली आहे.
पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने 20 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अजित सिंगने 65.62 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करून रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जरने हंगामातील सर्वोत्तम 64.96 फेकसह कांस्यपदक पटकावले.तर क्युबाच्या वरोना गोन्झालेझने 66.14 मीटर थ्रो करून या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.
तर, उंच उडी T63 स्पर्धेत, शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी पुन्हा एकदा भारताला दुहेरी पोडियम फिनिशची संधी दिली. शरद कुमारने 1.88 मीटरच्या उडीसह रौप्यपदक तर मरियप्पनने 1.85 मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले. अमेरिकेच्या फ्रेंच एज्राने 1.94 मीटरच्या उडीसह या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. तसेच दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर टी-20 शर्यतीत 55.82 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.
नेमबाजीमध्ये अवनी लेखरा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच1 प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. पण पदक लढतीत ती मागे पडली. दमदार सुरुवातीनंतर तिला 5 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. टोकियोनंतर अवनीने पॅरिसमध्येही 10 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने टोकियोमध्ये 50 मीटर थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आदल्या दिवशी ऍथलेटिक्समध्ये भाग्यश्री जाधवने महिलांच्या शॉट पुट F34 स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले.
🇮🇳🚨 𝗜𝗡𝗗𝗜𝗔’𝗦 𝗛𝗜𝗚𝗛𝗘𝗦𝗧 𝗘𝗩𝗘𝗥 𝗠𝗘𝗗𝗔𝗟 𝗧𝗔𝗟𝗟𝗬! A sensational end to day 6 of India’s Paralympics campaign sees us record a total of 20 medals to our name, the highest it has ever been.
🤔 How many more medals do you expect to see India get in the coming days?… pic.twitter.com/j0U0240Z7t
— Sportwalk Media (@sportwalkmedia) September 3, 2024
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो
9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी
10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी
11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी
12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी
13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक
15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी
16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर
17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी) – कांस्य पदक
18. शरद कुमार (ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी) – रौप्य पदक
19. अजित सिंग (ॲथलेटिक्स पुरुष भालाफेक) – रौप्य पदक
20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स पुरुष भालाफेक) – कांस्य पदक
हेही वाचा-
भारताच्या झोळीत 16वे पदक; वर्ल्ड चॅम्पियन दीप्ती जीवनजीची कांस्यची कमाई
मेहदी हसनची मन जिंकणारी कृती, मालिकावीर पुरस्काराची रक्कम ‘या’ लोकांना केली दान
यशस्वी जयस्वालच्या आयुष्यात खुलतेय प्रेमाची कळी? ‘या’ विदेशी तरुणीसोबत जोडलं जातंय नाव