सध्या बांगलादेशचा भारत दौरा सुरू आहे. भारत दौऱ्यावर दोन्ही संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली या मालिकेत भारताने बांगलादेशचा 2-0 ने धुव्वा उडवला. आता भारत-बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली. तत्पूर्वी या दौऱ्यानंतर भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. तत्पूर्वी या मालिकेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अजून एक रेकाॅर्ड आपल्या नावावर करू शकतो.
न्यूझीलंडविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंवरही निवड समितीने विश्वास व्यक्त केला. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी सामन्यांनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी लंडनला गेला होता. आता तो परतला आहे. त्याची नजर या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करण्यावर असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी किमान 1,000 धावा केल्याच्या यादीत कोहलीचा समावेश केला जाईल. ही कामगिरी करण्यापासून कोहली अजूनही 134 धावा दूर आहे. पण अलीकडच्या काळात कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्म फारसा चांगला राहिला नाही. त्याला छोट्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही.
कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या 11 कसोटी सामन्यांच्या 21 डावात 866 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 211 आहे. कोहलीने 45.57च्या सरासरीने धावा केल्या. त्याने 3 शतके आणि 3 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची आकडेवारी न्यूझीलंडविरुद्ध शानदार आहे. यावेळीही तो न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरूद्ध उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन दाखवू शकतो.
भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) या बाबतीत विराटच्या पुढे आहेत. सेहवाग निवृत्त झाला असून पुजारा बराच काळ भारतीय संघाचा भाग नाही. पुजाराने 12 सामन्यात 867 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 39.40 राहिली आहे. दरम्यान त्याने 2 शतकांसह 4 अर्धशतके झळकावली आहेत. सेहवागबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 12 सामन्यात 44.15च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 2 शतके, 3 अर्धशतके झळकावली आहेत.
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
महत्त्वाच्या बातम्या-
T20 World Cup; भारत पोहोचणार सेमीफायनलमध्ये? असे असणार समीकरण
बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टाॅप-5 गोलंदाज
ind vs nz; कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 प्रमुख खेळाडू