भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी (१४ पेब्रुवारी) आपल्या चेन्नई यात्रेवर होते. तेथील तमिळनाडू प्रशासनाच्या एका कार्यक्रमात त्यांनी राज्यासंबंधीच्या कित्येक योजनांचे उद्घाटन केले. याव्यतिरिक्त त्यांनी भारतीय रहिवास्यांसाठी एक रोमांचक गोष्टही शेअर केली. ते म्हणजे, ‘भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी कसोटी सामन्याचे हवाई दृश्य (एरियल व्ह्यू).’
त्याचे झाले असे की, शनिवारपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. रविवारी या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना प्रधानमंत्री मोदी यांचे विमान स्टेडियमच्या जवळून गेले. यादरम्यान मोदींनी स्टेडियमचा फोटो काढला आणि तो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
मोदींनी शेअर केलेल्या या फोटोत प्रेक्षकांनी गजबजलेल्या चेन्नईच्या स्टेडियममध्ये सामना चालू असल्याचे दिसत आहे. सोबतच स्टेडियमच्या आजूबाजूच्या चेन्नई शहरातील मोठमोठ्या इमारती, भवन, तसेच मेट्रो जातानाचे नयनरम्य दृश्य या फोटोत कैद झाले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘चेन्नईत चालू असलेल्या रंगतदार कसोटी सामन्याचे हवाई दृश्य पाहायला मिळाले.’
मोंदीनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाखोंच्या घरात लाईक्स दिल्या आहेत. तसेच फार क्वचित पाहायला मिळणारा क्षणभंगूर शेअर केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
Caught a fleeting view of an interesting test match in Chennai. 🏏 🇮🇳 🏴 pic.twitter.com/3fqWCgywhk
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2021
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व
चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारत मजबूत स्थितीत आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्माने झुंजार द्विशतकी खेळी केली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी योगदान दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नाबाद राहत आतिशी अर्धशतक केले. यासह भारताने पहिल्या डावात ३३० धावांचा डोंगर उभारला.
प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड अवघ्या १३९ धावांवरच गारद झाला. यासह भारताने पहिल्या डावात १९१ धावांची आघाडी घेतली. पुढे दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसाखेर १ बाद ५४ धावा करत भारत २४९ धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी गाजवला दुसरा दिवस; दिवसाखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी
बेन स्टोक्ससाठी ‘हे’ गोलंदाज धोक्याची घंटा, धाडलंय सर्वाधिक वेळा तंबूत; आर अश्विनचाही समावेश