‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ची (ICC Champions Trophy) पहिली स्पर्धा 1998 मध्ये बांगलादेशमध्ये खेळली गेली. तेव्हापासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 8 स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानकडे आहे. ही स्पर्धा 2025 मध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी रेकाॅर्ड्स रचले आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या 3 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
सौरव गांगुली- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) केला आहे. त्याने या स्पर्धेत 17 षटकार ठोकले. गांगुली पहिल्यांदा 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता आणि 2004 मध्ये शेवटचा खेळला होता. दरम्यान त्याने 13 सामने खेळले आणि 73.88च्या सरासरीने 655 धावा केल्या. यावेळी गांगुलीने 3 शतके झळकावली होती.
ख्रिस गेल- युनिव्हर्स बॉस म्हणजेच वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) षटकार मारण्यात माहिर होता. 2002 ते 2013 दरम्यान गेलने चॅम्पियन ट्राॅफीमध्ये (Champions Trophy) 17 सामने खेळले, त्याने 52.73च्या सरासरीने 791 धावा केल्या, ज्यामध्ये 15 षटकारांचा समावेश होता.
इऑन मॉर्गन- या यादीत इंग्लंडचा माजी विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) तिसऱ्या स्थानावर आहे. मॉर्गनने 2009 ते 2017 दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 13 सामने खेळले आणि यादरम्यान त्याने 43.90च्या सरासरीने 439 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 14 षटकार ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
BGT 2024-25; भारताला घाबरला ऑस्ट्रेलिया? स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!