दक्षिण अफ्रिकेत अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम सुरु झाला आहे. याबरोबरच भारतीय संघ चांगला असून अंतिम सामन्यातही त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. तर यावेळच्या संघात अनेक चांगले खेळाडू असून खेळाडूंनी विजयात निर्णायक भूमिका पार पाडली आहे. चला मग जाणून घेऊया काही प्रमुख खेळाडूंची नावे.
उदय सहारन (कर्णधार)
अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत उदय सहारनकडे भारताचे नेतृत्व असून आपल्या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ६४.८३च्या सरासरीने ३८९ धावा केल्या आहेत. सहारनने बांगलादेशविरुद्ध ६४, आयर्लंडविरुद्ध ७५, नेपाळविरुद्ध १०० व निर्णायक उपांत्य सामन्यात ८१ धावांची खेळी केली आहे. त्याच्या या सर्व खेळी निर्णायक क्षणी आल्याने महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
मुशीर खान (ऑलराउंडर)
मुशीर खानने संघासाठी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत निर्णायक भूमिका पार पाडल्या आहेत. तसेच त्याने आयर्लंडविरुद्ध ११८ व न्यूझीलंडविरुद्ध १३१ धावांच्या शतकी खेळी केल्या. तर, अमेरिकेविरुद्ध त्याने ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ६७.६०च्या सरासरीसह ३३८ धावा केल्या असून मुशीरने गोलंदाजीमध्ये सहा गडी बाद देखील केले आहेत.
सचिन धस (फलंदाज)
अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत सचिन धस हा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ७३.५०च्या सरासरीने २९४ धावा केल्या आहेत. सचिनने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली ९६ धावांची भागीदारी संघासाठी निर्णायक ठरली होती. त्यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध ११६ धावांची शतकी खेळी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे.
सौमी पांडे (फिरकीपटू)
फिरकीपटू सौमी पांडेने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात बळी मिळवले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांमध्ये सौमी पांडे तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत सहा सामन्यांत १७ फलंदाजांना बाद केले आहे.
नमन तिवारी (गोलंदाज)
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने आतापर्यंत विश्वचषकाच्या पाच सामन्यांत १० गडी बाद केले आहे. तर या कामगिरीसह तो भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. त्याने अमेरिका (४/२०) व आयर्लंडविरुद्ध (४/५३) चमकदार कामगिरी केली. लखनऊचा नमन हा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला आपला आदर्श देखील मानत आहे.
राज लिम्बानी (गोलंदाज)
अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत आपल्या ‘स्विंग’ आणि वेगाने राज लिम्बानी याने पाच सामन्यांत राजने ८ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात ६० धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत अंडर 19 संघ:- आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इननेश महाजन (विकेटकीपर), आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ:- हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (डब्ल्यू), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले.
महत्वाच्या बातम्या –
विराट-अय्यर बाहेर, राहुल-जडेजाची फिटनेस पाहून ठरणार प्लेइंग इलेव्हन; अंतिम 11साठी हे खेळाडू दावेदार
मेरिलीबोन क्रिकेट समितीची शिफारस; म्हणाले, कसोटी मालिकेत किमान तीन…