भारत विरुद्ध इंग्लंड संघात १२ मार्चपासून ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडतील. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताचा टी२० संघ जाहीर केला आहे.
या संघात मुंबईच्या सुर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुर्यकुमार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. याशिवाय वरुण चक्रवर्ती, राहुल तेवातिया आणि यष्टीरक्षक म्हणून इशान किशन यांना देखील भारतीय संघात संधी मिळाली आहे. या सर्वांची आयपीएल २०२० च्या हंगामात कामगिरी उल्लेखनीय झाली होती. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे हे बक्षीस असल्याचे म्हटले जात आहे.
वरुणला याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र त्याला त्याआधीच दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी टी नटराजनचा भारतीय संघात समावेश केला होता. पण आता पुन्हा वरुणला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
याशिवाय मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचे दरवाजे ठोकत असलेल्या सुर्यकुमारलाही भारतीय संघात संधी दिली आहे, त्याने आयपीएलमध्ये १६ सामन्यात ४८० धावा केल्या होत्या. तसेच राहुल तेवातियाने आयपीएल २०२०मध्ये २५५ धावा करण्याबरोबरच १० विकेट्सही घेतल्या होत्या. तर इशान किशनने १४ सामन्यात ५१६ धावा केल्या होत्या.
भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन
याशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. तो आयपीएलमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. पण आता तो तंदुरुस्त झाला असून त्याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली कर्णधार म्हणून तर रोहित शर्मा उपकर्णधार म्हणून कायम असेल. याशिवाय शिखर धवन, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचाही संघात समावेश आहे. तर गोलंदाजांमध्ये टी नटराजन, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
“आयपीएलच्या आधी स्मिथच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यास आश्चर्य वाटू नये”, दिग्गजाचे मोठा दावा