भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) एक आश्चर्यकारक दावा केल्याने, संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. कारण भविष्यात आपला मुलगा ‘सचिन तेंडुलकर’पेक्षा (Sachin Tendulkar) मोठा खेळाडू बनेल, असे हरभजनने म्हटले आहे. जर्सी नंबर 10 ला सचिन तेंडुलकरमुळे विशेष आदर दिला जातो आणि सध्याचा कोणताही भारतीय क्रिकेटर ’10’ नंबरची जर्सी घालत नाही. पण हरभजनने तर आपला मुलगा 10 नंबरची जर्सी घालूनच खेळणार असल्याचे सांगितले आहे.
न्यूज18च्या रिपोर्टनुसार हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला, “मी सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेटचा खेळ सोडलेला नाही. मला 10 नंबरची जर्सी घालून खेळायचे होते, पण मी तसे करू शकलो नाही. पण माझा मुलगा भविष्यात सचिन तेंडुलकरपेक्षा मोठा खेळाडू बनेल. जो ’10 नंबर’ जर्सी घालून खेळेल. मला वाटते की आजची तरुण पिढी भविष्यात सर्व क्रिकेटपटूंचे रेकाॅर्ड मोडेल.” हरभजनच्या मुलाचा जन्म जुलै 2021 मध्ये झाला होता आणि त्याचे वय सध्या फक्त 3 वर्षे आहे.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 1989 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते 2013 मध्ये निवृत्तीपर्यंत 10 नंबरची जर्सी परिधान केली होती. परंतु अनेक खेळाडूंनी सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ या क्रमांकावर खेळण्यास नकार दिला, त्यामुळे बीसीसीआयने 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली होती.
हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 कसोटी सामने खेळले आहेत. 103 कसोटी सामन्यात त्याने 417 विकेट्स घेतल्या, सोबतच त्याने 2,224 धावा देखील केल्या आहेत. 236 एकदिवसीय 269 विकेट्स घेतल्या, तर 1,237 धावा देखील केल्या आहेत. 28 टी20 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या, सोबतच त्याने 108 धावा देखील केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
BAN vs WI; बांगलादेशला मिळाला नवा कर्णधार! 3 वर्षांनी खेळणार ‘हा’ खेळाडू!
“रोहितनंतर जसप्रीत बुमराह…” स्टार खेळाडूचे बुमराबद्दल मोठे वक्तव्य!
जसप्रीत बुमराह, माॅर्ने माॅर्केलमुळे सिराज बनला हीरो? म्हणाला, “मी जस्सी भाईशी…”