यंदा दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) (5 सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे, तर (22 सप्टेंबरला) संपणार आहे. मात्र, बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफीसाठी खेळाडूंची नावासोबतच संघ देखील जाहीर केले आहेत. या स्पर्धेत 4 संघ खेळणार आहेत, ज्यामध्ये भारतीय संघातील जवळपास सर्वच स्टार खेळाडूंची नावे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दिसणार आहेत. पण भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
भारताकडे शिवम दुबे (Shivam Dube) आणि नितीश रेड्डी हे दोन चांगले अष्टपैलू पर्याय आहेत. शिवम दुबे आणि नितीश रेड्डी फलंदाजीशिवाय वेगवान गोलंदाजी करू शकतात. बीसीसीआयनं या दोन्ही खेळाडूंना दुलीप ट्रॉफीसाठी संधी दिली आहे. शिवम दुबे भारताकडून मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सतत खेळत आहे. त्याचबरोबर नितीश रेड्डीनं आपल्या क्षमतेनं खूप प्रभावित केलं आहे. पण हार्दिक भारताकडून शेवटची कसोटी सुमारे 6 वर्षांपूर्वी 2018 मध्ये खेळला होता, तेव्हापासून तो कसोटी खेळला नाही.
कसोटी क्रिकेटपासून हार्दिक सध्या खूपच दूर आहे. दुखापत ही हार्दिकसाठी अडचण बनली आहे. हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सतत दुखापतींशी झुंज देत आहे. याशिवाय तो एकदिवसीय आणि टी20 संघात देखील सतत खेळताना दिसत नाही. हार्दिक सध्या श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघात सामील होता. परंतु तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता.
हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) वय सध्या 30 वर्ष 308 दिवस आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 31.29च्या सरासरीनं 532 धावा केल्या आहेत. 11 कसोटी सामन्यात त्याच्या नावावर 17 विकेट्स आहेत. 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 1,769 धावा केल्या आहेत. सोबतच त्यानं 84 विकेट्स देखील घेतल्या आहेत. 102 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हार्दिकनं 1,523 धावा केल्या आहेत, तर 86 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट: सीएएसने फेटाळली विनेश फोगटची मागणी! नाही मिळणार रौप्य पदक
भारताचा स्टार फिरकीपटू ‘या’ लीगमध्ये घालतोय धुमाकूळ…!
“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!