टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना घवघवीत यश मिळाले होते. आता ही शानदार कामगिरी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील सुरू आहे. रविवारी (२९ ऑगस्ट) भाविना पटेलने आणि निषाद कुमारने रौप्यपदक मिळवून दिले होते. तसेच सोमवारी (३० ऑगस्ट) देखील भारतीय खेळाडूंचा जलवा सुरू आहे. सोमवारी सुमित अंटीलने भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावले आहे. हे भारतासाठी दिवसभरातील ५ वे पदक आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. तब्बल १०० वर्ष वाट पाहिल्यानंतर भारताला ट्रॅक अँड फील्ड प्रकारात पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाले होते. दरम्यान, टोकियो पॅरालंपिक स्पर्धेत देखील भालाफेक या क्रिडा प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. सुमित अंटीलने भालाफेक एफ ६४ इव्हेंटमध्ये ६८.८५ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. यासह त्याने नवीन विश्वविक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
सुमितने ६६.९५ मीटर भाला फेकून सुरुवात केली आणि नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर त्याने ६८.०८ मीटर भाला फेकून आपले स्थान निश्चित केले होते. तसेच त्याने तिसरा थ्रो ६५.२७ मीटर तर चौथा थ्रो ६६.७१ मीटर लांब फेकला होता. तर पाचवा थ्रो त्याने ६८.५५ मीटर लांब फेकून भारताला ऐतिहासिक पदक मिळवून दिले. तसेच विश्वविक्रमाला देखील गवसणी घातली.
या स्पर्धेत भारताच्या संदीप चौधरीने अंतिम फेरीत ६२.२० मीटर लांब भाला फेकून चौथा क्रमांक पटकावला. तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने रौप्यपदक, तर श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवाक्कूने कांस्यपदक पटकावले.(India’s sumit antil wins gold medal in Javelin throw)
https://twitter.com/IndianFootball/status/1432314541493260289
यापूर्वी सोमवारी सकाळी अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एयर रायफल स्टँडिंग एसएच१ स्पर्धेत सुवर्ण निशाना साधत सुवर्णपदक मिळवले आहे. तिने एकूण २४९.६ गुण मिळवत विश्वविक्रमही प्रस्थापित केला होता. पॅरालिम्पिकमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या क्रीडाप्रकारात तिच्यापाठोपाठ चीनच्या की सी झांग हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक जिंकले. तर युक्रेनच्या इरिना स्खेतनिकने २२७.५ गुणांसह कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये जाताना रडलो होतो’, श्रेयस अय्यरने सांगितली वेदनादायी आठवण
अरेरे! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेले कांस्यपदक झाले ‘अमान्य’






