अॅडलेड | भारताने आॅस्ट्रेलिया देशात तब्बल १० वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. यापुर्वी भारताने २००८मध्ये पर्थमध्ये कसोटी सामना जिंकला होता.
भारताने आजपर्यंत आॅस्ट्रेलियात ४५ कसोटी सामने खेळले असून त्यात ६ विजय आणि २८ पराभव पाहिले आहे तर ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहे.
२००८मध्ये जो भारतीय संघ विजयी झाला होता त्यातील केवळ इशांत शर्मा हा एकमेव खेळाडू आजच्या संघात आहे.
भारताचे आॅस्ट्रेलियातील कसोटी विजय-
१९७७- मेलबर्न, २२२ धावांनी विजयी
१९७८- सिडनी, १ डाव आणि २ धावांनी विजयी
१९८१- मेलबर्न, ५९ धावांनी विजयी
२००३- अॅडलेड, ४ विकेट्सने विजयी
२००८- पर्थ, ७२ धावांनी विजयी
२०१८- अॅडलेड, ३१ धावांनी विजयी
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत विजयासाठी भारताला ४ विकेट्सची गरज
–आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!