त्यामुळे आता १३ जुलैपासून सुरु होणारी वनडे मालिका १७ किंवा १८ जुलैला सुरुवात होऊ शकते. तसेच टी२० मालिका २४ ते २७ जुलै दरम्यान होऊ शकते. ज्यामुळे श्रीलंकेचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्हची प्रकरणे समोर आल्याने वाढवण्यात आलेला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करु शकेल. श्रीलंका क्रिकेट बोर्ड श्रीलंका आणि भारत संघांतील मालिकेचे नवे वेळापत्रक शनिवारी (१० जुलै) घोषित करण्याची शक्यता आहे.
यापूर्वी वनडे मालिका १३ ते १८ जुलैदरम्यान, तर टी२० मालिका २१ ते २५ जुलैदरम्यान होणार होती. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
या मालिकांसाठी श्रीलंकेने अजून संघ घोषित केलेला नाही. पण, भारताचा संघ घोषित झाला असून सध्या श्रीलंकेत आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. सध्या श्रीलंकेचे खेळाडू कोलंबोमधील हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत.
श्रीलंकेचा इंग्लंड दौरा वादाच्या भोवऱ्यात
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात नुकतीच मर्यादीत षटकांच्या मालिका पार पडल्या. या मालिका ४ जुलै रोजी संपल्यानंतर ६ जुलै रोजी इंग्लंडच्या संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात ३ खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघच क्वारंटाईन झाला आहे.
तसेच याच कारणामुळे ८ जुलैपासून पाकिस्तानविरुद्ध सुरु झालेल्या वनडे मालिकेआधी इंग्लंडला एका रात्रीत संपूर्ण संघ नव्याने तयार करावा लागला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्या संघाची घोषणा करताना अष्टपैलू बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धूरा सोपवली.
मात्र, असे असले तरी आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. कारण इंग्लंडचे ७ सदस्यांनंतर २ दिवसातच श्रीलंका संघातील सदस्य असलेले फ्लॉवर आणि डेटा ऍनालिस्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच यापूर्वी टी२० मालिकेत सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावलेले फिल व्हिटीकेस कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! शोएब अख्तरने इरफान पठाणला दिली होती अपहरणाची धमकी, वाचा तो किस्सा
“धोनीसह अन्य दिग्गजांची जर्सी बीसीसीआयने करावी निवृत्त”, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मत
भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकेचे खेळाडू नाही करणार सराव, ‘हे’ आहे कारण






