---Advertisement---

या एका शब्दात श्रेयस अय्यरने केले स्वत:च्या खेळीचे कौतुक, पहा व्हिडिओ

---Advertisement---

भारतीय संघाने बुधवारी(14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अनुक्रमे 71 आणि 65 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच त्याने या दोन्ही सामन्यात भारताची आवस्था बिकट असताना फलंदाजीला येत भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अनुक्रमे 125 आणि 120 धावांची भागीदारीही रचली.

तिसरा सामना संपल्यानंतर युजवेंद्र चहल होस्ट करत असलेल्या ‘चहल टीव्ही’ या बीसीसीआयच्या एका शोमध्ये चहलने अय्यरला त्याच्या या खेळीबद्दल आणि विराट बरोबर फलंदाजी करताना कसे वाटले असे विचारले.

त्यावर अय्यर म्हणाला, ‘खूप मजा आली. मला अशा दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी करायला आवडते. जेव्हा संपूर्ण ड्रेसिंग रुम नर्व्हस असतो. कारण त्यावेळी सामना पलटू शकतो आणि काहीही होऊ शकते.’

तसेच नंतर चहलने अय्यरला त्याची खेळी कशी होती हे एका शब्दात सांगण्यास सांगितले. यासाठी चहलने अभिनय केला. त्या अभिनयावरुन अय्यरने स्वत:च्या खेळीसाठी एक शब्द सांगायचा होता. तेव्हा चहलचा अभिनय पाहून अय्यर म्हणाला, ‘झकास… शानदार’

अय्यरने तिसऱ्या वनडेत 5 षटकारांसह 41 चेंडूत 65 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो सामन्याआधी काय खाऊन आला असा देखील प्रश्न चहलने या मुलाखती दरम्यान अय्यरला विचारला. त्यावर अय्यर म्हणाला, ‘मी माझा नेहमीसारखा नाश्ता केला होता. तीन अंडी खाल्ली होती.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी – रवी शास्त्रींची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

बोल्टच्या हेल्मेटमध्ये अडकला चेंडू आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!

या कारणामुळे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे झाले निधन, पोलिसांनी केला मोठा खूलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment