भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाला मोठा झटका बसला. न्यूझीलंडने भारताचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर भारताची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून घसरण झाली. आता भारताला दुसरा झटका बसला आहे. कारण भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) बेंगळुरू-इंदूर येथे होणाऱ्या आगामी 2 फेऱ्यांसाठी बंगालच्या रणजी संघात समावेश करण्यात आला नाही.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) गेल्या नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकात अहमदाबादमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तिथे दुखापत झाल्यापासून अजून शमी भारतीय संघापासून बाहेर आहे. या आठवड्यात तो रणजी ट्रॉफीद्वारे पुनरागमन करणार होता. दुखापतीमुळे शमीचा भारताच्या 18 सदस्यीय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठीही (Border Gavaskar Trophy) संघात समावेश करण्यात आला नाही.
बंगालचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांनी गेल्या आठवड्यात इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते, “आम्हाला आशा आहे की कर्नाटक आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यांमध्ये शमी आमच्यासोबत खेळेल. तो भारत आणि संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अलीकडेच त्याने सांगितले की तो उत्सुक आहे. बंगालसाठी काही रणजी सामने खेळा, ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याच्यासाठी चांगले असेल कारण आमचे 4 प्रमुख खेळाडू भारत आणि भारत अ संघाकडून खेळत आहेत.”
मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) फेब्रुवारीमध्ये लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याला परतण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्याच्या गुडघ्याला सूज आल्याने त्याला आणखी एक धक्का बसला. त्यामुळे त्याच्या परत येण्यास उशीर झाला.
रणजी ट्रॉफीच्या चौथ्या आणि पाचव्या फेरीसाठी बंगालचा संघ- अनुस्तुप मजुमदार, रिद्धिमान साहा, सुदीप चॅटर्जी, सुदीप कुमार घारामी, शाहबाज अहमद, हृतिक चॅटर्जी, एव्हलिन घोष, शुवम डे, शाकीर गांधी, प्रदीप प्रामानिक, आमिर घनी, इशान पोरेल, सूरज सिंधू जयस्वाल, एमडी कैफ, रोहित कुमार, आमिर गनी
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; टी20 मालिकेचं पूर्ण वेळापत्रक! कधी आणि कुठे पाहायचे सामने, जाणून घ्या सर्वकाही
AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव
जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव? ही नावे शर्यतीत