Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला विश्वचषकात ही भारतीय खेळाडू ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ शर्यतीत, पाकिस्तान-विंडीजला चांगलेच फोडलेले

February 25, 2023
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/SRH

Photo Courtesy: Twitter/SRH


सध्या दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. या विश्वचषकाची अंतिम फेरी रविवारी (26 फेब्रुवारी) खेळली जाईल. अंतिम फेरीत गतविजेता ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका एकमेकाशी भिडताना दिसणार आहेत. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकने जाहीर केली आहेत. या नामांकनांमध्ये भारताची युवा यष्टीरक्षक रिचा घोष हिचा समावेश आहे.

Unveiling the shortlist for the ICC Women's #T20WorldCup 2023 Player of the Tournament 🤩

Nine exceptional performers make it to the star-studded list. Who gets your vote? 🗳️

— ICC (@ICC) February 25, 2023

 

आयसीसीने शनिवारी (25 फेब्रुवारी) प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली. एकूण 9 खेळाडूंना यासाठी नामांकने मिळाली. भारताची युवा यष्टीरक्षक रिचा घोष नामांकने मिळालेल्या खेळाडूंपैकी एकमेव भारतीय आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या तीन, दक्षिण आफ्रिका व इंग्लंडच्या प्रत्येकी दोन व वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूचा समावेश आहे.

रिचा घोष हिने या स्पर्धेत भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना तिने सलग तीन चौकार ठोकत भारताला सामन्यात पुढे नेलेले. पाकिस्तानविरुद्ध 33, वेस्ट इंडीजविरुद्ध 43 व इंग्लंडविरुद्ध 47 धावा तीने केल्या. विशेष म्हणजे ती या तिन्ही सामन्यात नाबाद राहिली. तिने स्पर्धेत पाच सामने खेळताना 68 च्या सरासरीने 136 धावा केल्या. या दरम्यान तिचा स्ट्राईक रेट 130 होता.

या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (139 धावा व 69.50 सरासरी), एलिसा हिली (171 धावा व 58 सरासरी), ऍश्ले गार्डनर (81 धावा व 9 बळी) या नामांकित आहेत. इंग्लंडच्या नॅट सिव्हर (211 धावा), सोफी एक्लस्टन (11 बळी), दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉल्वर्ट व तझ्मीन ब्रिट्स यांच्यासह वेस्ट इंडीजची कर्णधार हायली मॅथ्यूज यांना देखील नामांकन मिळाले आहे.

(Indias Wicketkeeper Richa Ghosh Nominated For ICC Womens T20 World Cup Player Of The Tournament)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत
“ती काय जॉगिंग करत होती?” माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला ‘हा’ धडा


Next Post
Photo Courtesy: Instagram/Shikhar Dhawan

पंजाबने केला आयपीएल 2023 च्या सरावाचा श्रीगणेशा! गब्बर म्हणतोय, 'शेर आये है'

Team India

युपी वॉरियर्झने WPL साठी निवडली आपली उपकर्णधार! 'या' भारतीय खेळाडूला मिळाला मान

Team-India

मुलींना पाहताच धूम ठोकणारा भारतीय खेळाडू कोण? सर्वात आळशी क्रिकेटरचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल झटका

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143