भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील एकमात्र कसोटी सामना रविवारी (24 डिसेंबर) संपला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवला. स्नेह राणा सामनावीर ठरली असून भारतीय संघातील इतक खेळाडूंये योगदान देखील महत्वाचे राहिले. भारतीय महिला संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला असून भारतीय पुरुष संघाची याचे खास कनेक्शन तयार जाले आहे.
भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात अवघ्या 75 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी 16 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या राहिलेल्या पाच विकेट्स गमावल्या. तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 233 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने मात्र चौथ्या दिवसाच्या दुसऱ्याच सत्रात विजय निश्चित केला. महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकलेला हा पहिलाच कसोटी सामना आहे. रविवारी म्हणझेच 24 डिसेंबर 2023 रोजी हा इतिहास हमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील संघाने घडवला.
भारतीय पुरुष क्रिकेट संघ मात्र याआधी अनेकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका आणि सामने जिंकत आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय पुरुष संघाने जिंकलेला पहिला कसोटी सामना 1559 साली खेळला गेला होता. विशेष म्हणजे हा सामना भारताने जिंकला त्यादिवशी 24 डिसेंबर हीच तारीख होती. ही आकडेवारी अनेकांना विचारात टाकणारी ठरत आहे. 1559 मध्ये भारतीय पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला, तेव्हा भारताचे नेतृत्वत गुलाबराज रामचंद्र करत होते. तसेच जसुभाई पटेल यांनी 14 विकेट्स घेतल्यामुळे हे भारतासाठी मॅच विनर ठरले होते. गुरुवारी (21 डिसेंबर) सुरू झालेल्या महिला संघांमधील सामन्यात मात्र स्नेह राणा भारतासाठी मॅच विनर ठरली. तिने या सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला.
Vice-Captain Smriti Mandhana hit the winning runs as #TeamIndia register a 8⃣-wicket win over Australia in Mumbai 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/FiJorgZUMs
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
महिला संघांमध्ये पार पडलेल्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 219, तर भारताने 406 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 261 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतासमोर 75 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने रविवारी हे लक्ष्य दोन विकेट्सच्या नुकसानावर आणि 18.4 षटकांमध्ये गाठले. (India’s women’s cricket team has achieved a historic victory against Australia. The men’s team also has a special connection )
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
भारत महिला: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड.
ऑस्ट्रेलिया महिला: बेथ मूनी, फिबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्राथ, एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एनाबेल सदरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गार्थ, लॉरेन चीटल.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवताच हरमनचे सर्वात मोठे विधान; म्हणाली, ‘कठोर मेहनत आणि संयमाचे…’
Captain vs Captian: एलिसा हिलीने अडवला चेंडू; हरमनप्रीतला राग अनावर, पण पंचांचा निर्णय मात्र…