उद्यापासून सुरू एशियन गेम्समध्ये तंबाखूचे व्यापारी आणि इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मायकल बॅमबंग हार्टोनो हे सहभाग घेणार आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार ते आणि त्यांचा भाऊ रॉबर्ट हे ७५व्या स्थानावर आहे.
७८ वर्षांचे हार्टोनो यांचे वार्षिक उत्पन्न १६.७ बिलियन डॉलर आहे. जॅरम ग्रुप या मोठ्या सिगारेट कंपनीचे मालक आहे. ते या स्पर्धेत ब्रिज हा खेळणार आहेत. तसेच जकार्ता बरोबरच पालेमबंगमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू मलेशियाचे ली हुंग फोंग होते. त्यावेळी ते ८१ वर्षाचे होते तर ते ही ब्रिज हा खेळ खेळले. तर सर्वात तरूण खेळाडू नऊ वर्षाचा इंडोनेशियाचा स्केटबोर्डर अलिक नोवरी आहे.
“जर मी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर मी सरकारला बक्षिसाची रक्कम दान करणार. मी हा गेम बुध्दी सक्रिय राहण्यासाठी खेळतो. तसेच मला ताय ची खेळ पण आवडतो”, असे ते म्हणाले.
“आधी या खेळाला एशियन गेम्समध्ये स्थान नव्हते. कारण याला जुगार म्हटले जायचे. पण नंतर आशियाई ऑलिम्पिकने याला मान्यता दिली”, असे ते पुढे म्हणाले.
या १८व्या एशियन गेम्समध्ये ४५ आशियाई देशातून ११,००० अॅथलेटिक्स आणि ५००० अधिकारी सहभागी झाले आहेत. तसेच ही स्पर्धा २ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार
–दंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट