भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मुंबई येथे खेळला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली. सर्वच वेगवान गोलंदाजांनी आपली धार दाखवत ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 188 धावांवर गुंडाळला. मिचेल मार्शने एकाकी झुंज देत 81 धावा चोपल्या.
What a performance 🔥
India bowl out Australia for 188!#INDvAUS | 📝: https://t.co/V30MqMCC9U pic.twitter.com/9Aum5WN4sm
— ICC (@ICC) March 17, 2023
कसोटी मालिका आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मैदानात उतरला. नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणाने या सामन्यात सहभागी झाला नव्हता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात हेडला तंबूत पाठवत भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली. मिचेल मार्श व कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
स्मिथ 22 धावा करून परतल्यानंतर मार्शने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव यांचा चांगलाच समाचार घेतला. 65 चेंडूवर 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने त्याने 81 धावांची खेळी केली. त्याला जडेजाने बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. लॅब्युशेन 15, इंग्लिस 26 व ग्रीन 12 धावा करू शकला. तळातील फलंदाज विशेष योगदान न देऊ शकल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 188 धावांवर समाप्त झाला. भारतासाठी शमी व सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. तर, जडेजाला दोन बळी घेण्यात यश आले. हार्दिक व शार्दुल यांनी देखील एक एक गडी बाद केला.
(INDvAUS Mumbai ODI India Restricted Australia On Just 188 Shami Siraj Shines Marsh Hits 81)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?