भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा सामना भारतीय संघासाठी विसरण्यासारखा राहिला. मात्र, भारताच्या केएल राहुलने मैदानावर क्षेत्ररक्षण करताना अशी काही करामत केली, ज्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
सुपरमॅन राहुल
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर १२४ धावा फलकावर लावल्या. त्याचे प्रत्युत्तर देताना जोस बटलर व जेसन रॉय या इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या चार षटकात त्यांनी २९ धावा जमविल्या होत्या.
भारतासाठी पाचवे षटक ‘लोकल बॉय’ अक्षर पटेल घेऊन आला. त्या षटकातील पहिल्या चेंडूवर जोस बटलरने पुढे सरसावत उंचावरून षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या केएल राहुलने हवेत सूर मारत, चेंडूला षटकार जाण्यापासून रोखले. त्याने संघासाठी बहुमूल्य अशा चार धावा वाचविल्या. त्याच्या या प्रयत्नाचे सर्वांनी कौतुक केले. त्याच्या त्या अप्रतिम बचावाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pranjal__one8/status/1370400647820943364
https://twitter.com/kunaalydv/status/1370419305737678855
भारताचा दारूण पराभव
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने केवळ ७ बाद १२४ धावा काढू शकला होता. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, जेसन रॉय व जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. रॉयने ४९ तर बटलरने २८ धावा काढल्या. मलान (२४) व बेअरस्टो (२६) यांनी आणखी पडझड होऊ न देता इंग्लंडचा विजय साकारला. जोफ्रा आर्चरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
चहलने शंभरावा सामना बनविला संस्मरणीय; बुमराहला पछाडत ‘या’ यादीत पोहचला पहिल्या क्रमांकावर
अकरा वर्षांनी रोहित शर्मानंतर भारतीय खेळाडूने केली ‘अशी’ कामगिरी, अय्यरच्या नावे खास विक्रमाची नोंद
दसहजारी मनसबदारांसाठी मार्च महिना आहे खास, जुळून आला ‘हा’ खास योगायोग