---Advertisement---

INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

On: शनिवार, मार्च 20, 2021 12:20 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी (१८ मार्च) रंगणार आहे. हा सामना मालिका विजेता ठरवण्यासाठी निर्णायक सामना असणार आहे.

मालिकेतील स्थिती

भारत आणि इंग्लंड संघातील टी२० मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना भारताने जिंकत १-१ अशी बरोबरी केली. मात्र, पुन्हा इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर रंगतदार झालेला चौथा सामना भारताने जिंकत पुन्हा मालिकेत २-२ अशी बरोबरी केली.  त्यामुळे ५ सामन्यांच्या या मालिकेत आता शेवटचा सामना जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल.

भारत आणि इंग्लंड संघाचा टी२० सामन्यांचा इतिहास

भारत आणि इंग्लंड संघ आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १८ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील ९ सामने भारताने जिंकले आहेत, तर ९ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. यातील १० सामने भारतात झाले आहेत. या १० सामन्यांपैकी ५ सामने भारताने जिंकले आहेत, तर ५ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच सध्या टी२० क्रमवारीत इंग्लंड आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहाता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे लक्षात येते.

भारताच्या ११ जणांच्या संघात होणार बदल?

पाचवा सामना निर्णायक सामना असल्याने दोन्ही संघ आपला मजबूत संघ उतरवण्याचाच प्रयत्न करतील. मात्र, यावेळी संघात जास्त बदल करुन संघसंयोजन बिघडले जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही संघांच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चौथ्या टी२० सामन्यासाठी खेळलेले अंतिम ११ जणांचे संघच पाचव्या सामन्यासाठीही कामय राहू शकतात.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा टी२० सामना घ्या जाणून –

१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना २० मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचवा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचव्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचव्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचव्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचव्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शिखर धवन, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, राहुल तेवतिया, टी नटराजन, इशान किशन, राहुल चाहर

इंग्लंड संघ – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, सॅम बिलिंग्ज, रीस टोपली, मार्क वूड, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन.

महत्त्वाच्या बातम्या –

अफगाणिस्तानच्या कर्णधारानं घडवला इतिहास; ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या विश्वविक्रमाची केली बरोबरी

इंग्लंडने चौथा टी२० सामना तर हरलाच पण आयसीसीने ‘ही’ शिक्षाही सुनावली

रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी सुर्यकुमारबद्दल केलेलं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, पाहा काय होतं ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---