भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDVSA) यांच्यात बुधवारी (28 सप्टेंबर) पहिला टी20 सामना खेळला गेला. तिरूअनंतपुरम येथे खेळला गेलेला हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. यावेळी भारताचा उपकर्णधार-सलामीवीर केएल राहुल याने अर्धशतकी खेळी केली. ही खेळी करताना त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांचा विक्रम मोडला आहे.
केएल राहुल (KL Rahul) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मधील 19वे अर्धशतक केले आहे. तसेच त्याने दोन शतकेही केली आहेत. त्याने 65 सामन्यात 40च्या सरासरीने 2080 धावा केल्या आहेत. यामुळे तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. तर जागतिक स्तरावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणाऱ्यांमध्ये रोहित पहिल्या, विराट दुसऱ्या आणि राहुल 16व्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक करत राहुलने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा एक खास विक्रम मोडला आहे. रोहित-विराट यांनी 10 वेगवेगळ्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये अर्धशतक केले आहे. तर आता राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करताना त्याने 11 वेगवेगळ्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
राहुलने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध प्रत्येकी तीन-तीन अर्धशतके केली आहेत. तसेच वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान विरुद्ध प्रत्येकी दोन अर्धशतके केली आहेत. याच्याव्यतिरिक्त बांगलादेश, इंग्लंड, आर्यलंड, नामिबिया, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक अर्धशतके केले आहे.
#TeamIndia finish things off in style! ???? ????
A SIX from vice-captain @klrahul to bring up his FIFTY as India take a 1-0 lead in the 3-match #INDvSA T20I series. ???? ???? @mastercardindia | @StarSportsIndia pic.twitter.com/6Fh0APf52F
— BCCI (@BCCI) September 28, 2022
राहुलला आगामी टी20 विश्वचषकात निवडले आहे. तत्पूर्वी तो आऊट ऑफ फॉर्म होता त्यातच विराटने शतकी खेळी करत त्याची सलामीची जागा धोक्यात आणली होती. आता तो फॉर्ममध्ये परतला असून त्याच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारताला आहे. त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेलेला 2022मधील आतापर्यंतचा 9वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. त्यामध्ये त्याने 3 अर्धशतके केली आहेत. या सामन्यात त्याने 56 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार खेचत नाबाद 51 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-





