भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. यामधील शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदौर येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 49 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे, तर तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या वाईट कामगिरीचा अनुभव आला. या सामन्यात मोहम्मद सिराज याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले, मात्र त्याने एक खूप मोठी चूक केली जी संघाला खूपच महागात पडली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेविड मिलर शेवटच्या षटकात फलंदाजी करताना त्याने दीपक चाहर (Deepak Chahar) याला लागोपाठ तीन षटकार मारले. त्याच षटकामध्ये मिलरला बाद करण्याची संधी भारताकडे होती, मात्र मोहम्मद सिराज याने त्याचा झेल उत्तमरित्या घेतला पण त्याने नकळत पाय सीमारेषेवर ठेवला.
षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिलरने उंच शॉट मारला तेव्हा डीप स्क्वायर लेगवर उभ्या असलेल्या सिराजने झेल घेतला, मात्र समतोल बनवण्याच्या नादात त्याचा पाय सीमारेषेला लागला. त्याच्या या चूकीमुळे दक्षिण आफ्रिकेला षटकार मिळाला आणि मिलरला जीवनदान. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि चाहर हे खूपच रागात दिसले. तसेच मिलरने पुढचा चेंडूही सीमारेषेपार पोहोचवला. 20व्या षटकात फलंदाजी करायला आलेल्या मिलरने 5 चेंडूत 19 धावा ठोकल्या. यामुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 227 झाली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसले. मागील दोन सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या रायली रुसो याने धमाकेदार शतकी खेळी केली. त्याने 48 चेंडूतच 100 धावा पूर्ण केल्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली. रोहित शून्यावरच बाद झाला, तर श्रेयस अय्यरनेही एक धाव आपली विकेट गमावली. यावेळी भारताकडून सर्वाधिक धावा दिनेश कार्तिक याने केल्या. त्याने 21 चेंडूत 46 धावा केल्या.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1577322786858897408?s=20&t=LVA5qK0FfE_2-M75aX-lGg
या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळणार असून पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनऊ येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी