---Advertisement---

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना; पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्येच खेळवण्यात येणार आहे. चेन्नईलाच झालेला पहिला कसोटी सामना भारतीय संघाने २२७ धावांनी गमावला आहे. यामुळे मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.

अशात चेन्नईतील खेळपट्टी आणि हवामान महत्वाची भूमिका बजावू शकतात. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नव्हती. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करत असते. परंतु भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांना अपेक्षित मदत मिळाली नाही. याच कारणास्तव भारतीय संघाला पराजयाचा सामना करावा लागला.

खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना करेल मदत – रहाणे

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी अशी आशा व्यक्त केली आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यात चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल. तसेच रहाणे पुढे म्हणाला की, “हा, ही खेळपट्टी पूर्णपणे वेगळी दिसत आहे. मला विश्वास आहे की ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल. परंतु, जसे मी पहिल्या कसोटी सामन्याआधी म्हटले होते की, तुम्हाला वाट पहावी लागेल, आणि पाहावे लागेल की पहिल्या सत्रात काय होते.”

अक्षर पटेल संघात खेळणार की नाही याबद्दल बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला,” आम्हाला पहिल्या कसोटी सामना विसरावा लागेल. आम्ही या परिस्थितींना चांगलच ओळखून आहोत आणि आम्हाला उद्या आमचा सर्वश्रेष्ठ खेळ खेळावा लागेल.आमच्यासाठी एक चांगली बातमी आहे की, अक्षर पटेल तंदुरुस्त आहे. परंतु मी आता नाही सांगू शकत की अंतिम ११ मध्ये कोण असणार. आमचे सर्वच फिरकी गोलंदाज चांगले आहेत आणि ज्यांना संधी मिळेल ते चांगलीच कामगिरी करतील.”

दुसऱ्या कसोटी सामन्यात ५ दिवस कसे असेल चेन्नईचे हवामान

चेन्नईत नेहमी खेळाडूंना खेळत असताना अती उष्णतेमुळे खेळाडूंना डीहायड्रेशनचा त्रास होत असतो. अशातच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पुढच्या ५ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता नाही. परंतु खेळाडूंना अती उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. पुढील पाच दिवसात तापमान ३० डिग्री सेल्सिअस इतके असणार आहे. तसेच १४ किलोमीटर प्रती तासानेच्या हवा असेल.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी स्पर्धा –

चेन्नईमध्ये होणारा सामना भारतीय संघासाठी केवळ मालिकेत बरोबरी करण्याच्या दृष्टीनेच नाही तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठीही फार महत्त्वाचा आहे. कारण जर हा सामना भारतीय संघ पराभूत झाला तर त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सुरु असलेल्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.

कारण भारताला जर अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर इंग्लंडविरुद्धची मालिका कोणत्याही परिस्थितीत २-१ किंवा ३-१ अशाच फरकाने जिंकायची आहे. त्यामुळे जर इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना भारतीय संघ पराभूत झाला. तर भारताचे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

दुसऱ्या सामन्याबद्दल सर्वकाही –

सामन्याची तारिख – १३ ते १७ फेब्रुवारी

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

सामन्याचे ठिकाण – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार

यातून निवडले जातील अंतिम ११ जणांचे संघ – 

भारतीय संघ –

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, शाहबाज नदीम, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, वृद्धिमान साहा, मयंक अगरवाल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, केएल राहुल, अझार पटेल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज

इंग्लंड संघ –

डोमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, जॅक लीच, ख्रिस वोक्स, ऑली स्टोन, स्टुअर्ट ब्रॉड

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल लिलावासाठी निवड न झालेला श्रीसंत झाला भावूक; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

छोटा पॅक बडा धमाका! बेस प्राईज २० लाख असलेल्या ‘या’ खेळाडूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशांचा पाऊस

चाळीशी पार करून ‘पठ्ठ्या’ उतरलाय आयपीएलच्या लिलावात, एकेकाळी खेळला होता विराटसोबत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---