---Advertisement---

INDvsENG : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना; जाणून घ्या सर्वकाही

On: गुरूवार, मार्च 4, 2021 1:20 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरु होणार आहे. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यातून ही आघाडी टिकवून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल, तर इंग्लंड संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल.

या सामन्यावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत की ऑस्ट्रेलिया प्रवेश करणार याचा निकालही अवलंबून आहे. कारण जर या सामन्यात भारताने विजय मिळवला किंवा हा सामना अनिर्णित राहिला तर भारताला अंतिम सामन्यात प्रवेश करता येणार आहे. पण जर हा सामना भारत पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

मालिकेतील स्थिती – 

सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने या मालिकेत आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. मात्र, भारताने पुढच्या दोन कसोटीत दमदार कामगिरी करत आघाडी मिळवली. त्यामुळे चौथा कसोटी सामना जिंकून किंवा सामना अनिर्णित राखून मालिका जिंकण्याची भारतीय संघाकडे संधी असणार आहे. तर इंग्लंड मालिका पराभव टाळण्यासाठी आणि मालिकेत बरोबरी करण्यासाठी खेळतील.

भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल –

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटीतून माघार घेतली असल्याने भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होणे निश्चित आहे. बुमराहच्या जागेवर उमेश यादव किंवा मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

तसेच इंग्लंडच्या अंतिम ११ जणांच्या संघातून जेम्स अँडरसन किंवा स्टुअर्ट ब्रॉड यांच्यातील एकाला बाहेर बसावे लागू शकते. त्यांच्याऐवजी डॉमनिक बेस अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन करु शकतो.

अशी असू शकते खेळपट्टी 

चौथ्या कसोटीसाठी तिसऱ्या कसोटी प्रमाणेच गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार घेऊ शकतात.

अहमदाबाद कसोटीचा इतिहास

खरंतर हा सामना होत असलेलं नरेंद्र मोदी स्टेडियम पुर्नबांधणी करण्यात आलेले स्टेडियम आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेला तिसरा कसोटी सामना हा या पुर्नबांधणी केलेल्या स्टेडियममध्ये झालेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यापूर्वी जून्या स्टेडियमवर १२ कसोटी सामने भारताने खेळले होते. या १२ कसोटींपैकी ४ कसोटी सामने भारताला जिंकण्यात यश आले होते, तर २ सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता आणि ६ सामने अनिर्णित राहिले होते.

सध्याच्या चालू कसोटी मालिकेआधी भारताने या स्टेडियममध्ये शेवटचा सामना इंग्लंडविरुद्धच २०१२ साली खेळला होता. ज्यात भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला होता.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना घ्या जाणून –

१.भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना ४ ते ८ मार्च दरम्यान खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरु होईल. त्याआधी सकाळी ९.०० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, उमेश यादव, मयंक अगरवाल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , वृद्धिमान साहा, केएल राहुल, हार्दिक पंड्या

इंग्लंड संघ: डॉमिनिक सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), डॉमिनिक बेस, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, ख्रिस वोक्स , ऑली स्टोन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स.

महत्त्वाच्या बातम्या –

वनक्कम ‘थाला’! एमएस धोनीचे आयपीएलसाठी चेन्नईत आगमन, पाहा फोटो

ऑन माय वे! भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम; वनडे मालिकेत करु शकतो पुनरागमन

वॉनचे टिकास्त्र थांबेना! आता ‘हा’ व्हिडिओ शेअर करत साधला अहमदाबादच्या खेळपट्टीवर निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---