भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)मोठे शॉट्स अधिक खेळत नाही, मात्र एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर त्याचा सर्वाधिक भर असतो. यामुळे त्याला निर्धाव गेलेले चेंडू आवडत नाही. त्याला धावफलक हलता ठेवायचा असतो, यामुळे विरोधी संघावर दडपण येईल. सोबतीला एखादा असाच खेळाडू भेटला ज्याचे विचार विराटशी जुळले तर अधिक चांगले. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)देखील असाच आहे, मात्र तरीही विराट त्याच्यावर रागावला. जेव्हा हार्दिकने दुसऱ्या धावासाठी पळण्यास नकाल दिला तेव्हा विराटने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झाले असे की, भारताच्या डावाच्या 43व्या षटकात कसुन रजिथा (Kasun Rajitha) गोलंदाजी करण्यास आला. त्याने टाकलेला चेंडू विराटने टोलवला आणि एकेरी धाव घेतली. तो दुसरी धाव घेण्यासही पळाला, मात्र अर्ध्यातच हार्दिकने त्याला परत पाठवले. यामुळे विराट नाराज दिसला आणि त्याने हार्दिकडे रागाने पाहिले. तेव्हा हार्दिकने मागे वळून पाहिले नाही.
या प्रकाराच्या एक षटकानंतर हार्दिक त्याच गोलंदाजाकडून बाद झाला. तो 12 चेंडूत एक षटकार मारत 14 धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे विराटने मागील तीन वर्षात प्रथमच लागोपाठ वनडे शतक केले. या सामन्यात त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या. यासाठी त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला. त्याचे हे वनडेतील 45वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73वे शतक ठरले. तोही रजिथाच्या गोलंदाजीवरच बाद झाला.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1612809693294120961?s=20&t=Tbqdh1oDuJ57V1yDgSNp5g
गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यानंतर विराट म्हणाला, “350 पेक्षा मला संघासाठी 20 धावा अतिरिक्त कराव्याशा वाटल्या. कारण ती धावसंख्या गाठण्यासाठी एकातरी फलंदाजाला 150 किंवा 140 धावा करणे आवश्यक होते. तसेच मोठे लक्ष्य असले तर गोलंदाजांनाही त्याचा फायदा होतो.”
भारताने पहिल्या वनडे सामन्यात मंगळवारी (10 जानेवारी) श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामध्ये विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा (83) आणि शुबमन गिल (70) यामुळे भारताने 7 विकेट्स गमावत 373 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाने नाबाद 108 धावा केल्या, मात्र त्यांना सामना गमवावा लागला.
या मालिकेत हार्दिकची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा वनडे सामना 12 जानेवारीला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे.
(INDvSL 1st ODI Virat Kohli Gives Death Stare to Hardik Pandya after he denies second run)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 1: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच
मोठी बातमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, चार स्पिनर्ससोबत भारताची बॅंड वाजवण्यास तयार