---Advertisement---

INDvsNZ: टी20 सामन्यात आले होते गिलचे वादळ, तब्बल 168 धावांनी जिंकला भारत

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 4:50 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२१ जानेवारी) नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताला विजयाच्या आशा आहे, कारण भारताने नुकतेच घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या दोन्ही संघात तब्बल तीन वर्षानंतर टी२० सामना होत आहे. शेवटी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली होती.

फेब्रुवारी २०२३मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामध्ये शुबमन गिलने झंझावाती शतक ठोकले होते. त्याने ६३ चेंडूत नाबाद १२६ धावा केल्या होत्या. तसेच सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी आणि हार्दिक यांनी ताबडतोब फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २३४ धावासंख्या उभारली होती.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अडखळत सुरूवात झाली होती. हार्दिकने अर्शदीप सिंगच्या साथीने न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरूंग लावला होता. त्याही वेळी डॅरिल मिचेल याने संघासाठी सर्वाधिक (३५) धावा केल्या होत्या. हार्दिकने ४ षटकात १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. अर्शदीपने ३ षटकात १६ धावा देत २ विकेट्स तसेच उमरान मलिक आणि शिवम मवी यांनीही प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे न्यूझीलंडचा संघ ६६ धावसंख्येवरच सर्वबाद झाला.

त्या सामन्यात गिल सामनावीर ठरला. तीन सामन्यांची ती टी२० मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. सध्या गिल भारताच्या टी२० संघात नाही तसेच त्याची टी२० विश्वचषक २०२६साठी निवडही झालेली नाही.

न्यूझीलंडने भारतात भारताविरुद्ध अजूनही टी२० मालिका जिंकलेली नाही, मात्र त्यांचा सध्याचा फॉर्म पाहता काहीपण होऊ शकते. त्याचबरोबर या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत २५ टी२० सामने खेळले गेले. यातील १४ सामने भारताने, १० न्यूझीलंडने तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---