क्रिकेटमधील सर्वात मोठी रायव्हलरी म्हणजे भारत आणि पाकिस्तान. विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. यजमान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा चाहते मागच्या काही महिन्यांपासून करत होते. शनिवारी (14 ऑक्टोबर) अखेर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने या सामन्यात अप्रतिम चेंडू टाकत सलामीवीर इमाम उल हक याला स्वस्तःत बाद केले.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतासाठी पहिली विकेट मोहम्मद रिझवानने घेतली. सलामीवीर अब्दुल्ल्हा शफिक याला 20 धावांवर सिराजने पायचीत केले. ईमाम उल हक यानेही वैयक्तिक 36 धावांची खेळी केल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेलबाद झाला. पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकात हार्दिक पंड्या याने त्याची विकेट घेतली. इमामची विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या याने त्याच्याकडे पाहून “बाय-बाय” म्हटल्याचे पाहायला मिळाले.
Bye, bye – Imam Ul Haq…!!!
Thank you for coming, says Hardik Pandya. pic.twitter.com/KBenNA82po
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
(Bye, bye – Imam Ul Haq…!!! Thank you for coming, says Hardik Pandya.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
सव्वा लाख भारतीयांच्या मुखातून गायले गेले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ
अर्रर्र…मोठी चूक! INDvsPAK सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, फोटो जोरदार व्हायरल