---Advertisement---

अर्शदीप-आवेशच्या घातक गोलंदाजीपुढे आफ्रिकन फलंदाजांनी टेकले गुडघे, यजमान 116 धावांवर All Out

On: रविवार, डिसेंबर 17, 2023 4:02 PM
INDvsSA-1st-ODI
---Advertisement---

INDvsSA 1st ODI: 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने आहेत. हा सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअम येथे खेळला जात आहे. या सामन्यात यजमानांना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भलताच महागात पडल्याचे दिसले. यावेळी भारतीय गोलंदाजांंनी यजमानांच्या फलंदाजांना घाम फोडत 116 धावांच्या आतच रोखले. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 117 धावांचे आव्हान मिळाले आहे.

यजमानांचे सगळेच फलंदाज फ्लॉप
या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी आफ्रिकेचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा सिद्ध केला. यावेळी आफ्रिकेचा डाव 116 धावांवर संपुष्टात आला.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले फेहलुक्वायोने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त युवा फलंदाज टोनी डी झोर्झी यानेही 22 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. तसेच, कर्णधार एडेन मार्करमने 12, तबरेज शम्सीने नाबाद 11 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. विस्फोटक फलंदाज रीझा हेंड्रिक्स आणि रासी व्हॅन डर ड्युसेन शून्यावर तंबूत परतले. हेन्रीच क्लासेन (6) आणि डेविड मिलर (2) हे धुरंधरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

भारताकडून अर्शदीप-आवेशची घातक गोलंदाजी
यावेळी भारताकडू गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) यांनी उच्च दर्जाची गोलंदाजी केली. अर्शदीपने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 37 धावा खर्चत 5 विकेट्स घेतल्या. तसेच, आवेशने 8 षटके गोलंदाजी करताना 27 धावा खर्चत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, कुलदीप यादव यानेही 1 विकेट नावावर केली.

टी20 मालिका बरोबरीत
या वनडे मालिकेपूर्वी उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात यजमानांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर अखेरच्या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवत मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली होती. या मालिकेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे होते. मात्र, आता वनडे मालिकेचे कर्णधारपद केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे आहे. (South Africa all out on 116 india needs 117 runs to win )

हेही वाचा-
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर
अर्शदीप जोमात, फलंदाज कोमात! पहिल्याच ओव्हरमध्ये पठ्ठ्याने दोघांचा काढला काटा, शून्यावर परतले तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---