सध्या आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषक सुरू असून २२व्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत केले. स्नेह राणा आणि यास्तिका भाटिया यांच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने हा सामना ११० धावांनी जिंकला. हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर एका कॅचसाठी एकमेकींना धडकल्या. यावेळी त्यांची एकमेकींसोबत झालेली टक्कर इतकी भयंकर होती की, एखाद्याला दुखापत झाली असती. त्यांच्या त्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बांगलादेश (BAN vs IND) संघाच्या ३७व्या डावात हा प्रकार पाहायला मिळाला. बांगलादेशची फलंदाज नाहिदा अख्तरने खेळलेला चेंडू हवेत खूप उंच उडाला. हा झेल पकडण्यासाठी पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा या दोघी सुद्धा धावल्या आणि झेल घेताना दोघी एकमेकींना धडकल्या. हा झेल स्नेह राणाने घेतला, यावेळी कोणालाही दुखापत झाली नाही. आयसीसीने (ICC) हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहीले की, ‘उप्स, परंतु भारताला विकेट मिळाली.’
https://www.instagram.com/reel/CbZdC33lgaQ/?utm_source=ig_embed&ig_rid=5ccdb112-bbbd-411b-9c00-9698e44d1122
भारतासाठी २७ धावा करणाऱ्या आणि ४ विकेट्स घेणाऱ्या स्नेह राणाने (Sneh Rana) भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या. सलामीला आलेल्या स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्माने ७४ धावांची भागीदारी केली, परंतु नंतरच्या ५ चेंडूत ३ विकेट्स गेल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. स्नेह राणाने ४ विकेट्स घेतल्या. झुलन गोस्वामीने २ आणि पूजा वस्त्राकरने २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघ ११९ धावांवरच सर्वबाद झाला. भारतीय संघ सध्या आयसीसी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत. आयसीसी फलंदाजी क्रमावारीत यादीत मिताली राज ९व्या क्रमांकावर आहे, तर स्म्रीती मंधाना १०व्या क्रमांकावर आहे. आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत झुलन गोस्वामी ७व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा आयसीसी रँकिंगमध्ये ‘रॉकस्टार’ ठरला रवींद्र जडेजा; पण रोहितची ‘या’ स्थानावर घसरण
चर्चा धोनीच्या उत्तराधिकारीची; रैना म्हणतोय, ‘या’ चार खेळाडूंमध्ये आहे क्षमता
जेसन रॉयवर दंडासहित २ सामन्यांची बंदी! इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून कडक कारवाई