भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. भारताने मालिकेतील शेवटचा सामना 60 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विक्रम केला. संघाने स्वत:च्याच सर्वोच्च टी20 धावसंख्येचा विक्रम मोडला. यावेळी स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी अप्रतिम कामगिरी केली. या दोघींनी अर्धशतके झळकावली. मानधनाने 77 आणि घोषने 54 धावा केल्या.
वास्तविक भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या दरम्यान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 217 धावा केल्या. ही महिला टीम इंडियाची सर्वात मोठी टी20 धावसंख्या ठरली. स्मृती मानधना आणि उमा छेत्री त्याच्यासाठी सलामीला आल्या. मात्र उमा शून्यावर बाद झाली. तर मानधनाने 47 चेंडूत 77 धावा केल्या. ज्यात तिने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. तर दुसरीकेड तिसऱ्या स्थानावर आलेल्या रिचा घोषने 21 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. ज्यात तिने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. तर आखेरीस राघवी बिष्टने नाबाद 31 धावा केल्या.
टी20 मध्ये भारतीय महिला संघाची सर्वोच्च धावसंख्या 201 होती. युएईविरुद्ध संघाने ही खेळी खेळली होती. भारताने 20 षटकात 5 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. मात्र आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. टीम इंडियाची सर्वात मोठी धावसंख्या 217 धावा ठरली आहे. यापूर्वी भारताने इंग्लंड महिलांविरुद्धच्या सामन्यात 198 धावा केल्या होत्या. ही संघाची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 60 धावांनी पराभव केला. यासह मालिकाही जिंकली. ज्यामध्ये स्मृती मानधनाला मालिकावीर खेळाडू म्हणून निवडण्यात आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर आहे. मानधनाने 3 सामन्यात 193 धावा केल्या. तिने या तीनही सामन्यात अर्धशतक झळकावली.
𝙈𝙞𝙡𝙚𝙨𝙩𝙤𝙣𝙚 𝙐𝙣𝙡𝙤𝙘𝙠𝙚𝙙 🔓
How impressive was that from #TeamIndia! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fhQRIWAIU9
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
हेही वाचा-
बांग्लादेशने रचला इतिहास, टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा प्रथमच व्हाईटवॉश
“जसप्रीत बुमराह वसीम अक्रमसारखा…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
यंदाच्या वर्षी ‘या’ 3 खेळाडूंनी वनडेमध्ये भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा