भारतीय संघातील सर्वात खट्याळ आणि सीनियर खेळाडूंचा लाडका युजवेंद्र चहल हा सध्या त्याच्या विवाहित आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मा हिने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून चहल हे आडनाव हटवले आहे. तसेच चहलनेही इंस्टाग्रामवर न्यू लाईफ लोडिंग अशी स्टोरी ठेवली होती. यामुळे दोघांच्या नात्यात दरार आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यानंतर दोघांनीही या सर्व अफवा असून आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचे सांगत या चर्चांवर पूर्ण विराम लावला आहे.
मात्र या प्रकरणानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये भारताच्या फिरकीपटू चहलची पत्नी नक्की कोण आहे?, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. धनश्रीचे वडील दुबईत असतात. ते व्यावसायिक आहेत. तिच्या आईचे नाव वर्षा वर्मा आहे. तर, तिला विशाल वर्मा नावाचा भाऊ आहे.
या लेखात, चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माबद्दल अजून काही माहिती देण्यात आली आहे. Information About Dhanashree Verma
१. कोरियोग्राफर आहे धनश्री –
२७ सप्टेंबर १९९६ला दुबई येथे जन्मलेल्या धनश्रीला डान्सची खूप आवड आहे. ती कोरियोग्राफी (नृत्यदिग्दर्शन) करते. सोशल मीडियावर तिच्या कोरियोग्राफीला फॉलो करणारे खूप चाहते आहेत. भारतीय कोरियोग्राफर शिमक डावर यांनी धनश्रीला डान्स शिकवला आहे. चहल आणि धनश्री खूप वेळेपासून एकमेकांना ओखळत आहेत. पण, मैदानावर आपल्या चेंडूनी फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या चहलने त्यांच्या नात्याला साखरपुडा होण्याआधी सर्वांपासून लपवून ठेवले.
२. डॉक्टर आहे धनश्री –
चहलची होणारी पत्नी धनश्री ही कोरियोग्राफर तर आहेच. पण, सोबतच ती डॉक्टरदेखील आहे. ती दंतचिकित्सक (डेंटिस्ट) आहे. तिने मिथिबाई महाविद्यालय मुंबई आणि डिवाय पाटील विद्यापीठ नवी मुंबईमधून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धनश्रीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे.
३. यूट्यूबर आहे धनश्री –
अष्टपैलू धनश्री कोरियोग्राफर आणि डान्सरसोबत यूट्युबर आहे. यूट्युबवर मोठ्या प्रमाणात तिच्या डान्सचे व्हिडिओ आहेत. तिच्या यूट्युब चॅनेलचे नाव ‘धनश्री वर्मा’ हे आहे. तिने तिचा सर्वात पहिला व्हिडिओ ३ वर्षांपूर्वी पोस्ट केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत तिचे यूट्युबवर १.५५ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. ती विशाल मिश्रा या संगीत दिग्दर्शकासोबत मिळून काम करते.
४. डान्स कंपनी चालवते धनश्री –
धनश्री स्वत:ची एक डान्स कंपनी चालवते. तिच्या कंपनीचे नाव ‘धनश्री वर्मा कंपनी; असे आहे. ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते आणि ती हिप-हॉप स्पेशलिस्ट आहे.
५. जिम लव्हर आहे धनश्री –
क्रिकेटपटू असूनही चहल जिममध्ये जास्त वर्कआउट करताना दिसत नाही. पण त्याची होणारी पत्नी जिम लव्हर आहे. तिला वर्कआउटची खूप आवड आहे. इंस्टाग्रामवर तिचे जिममधील खूप फोटो पाहायला मिळतात.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पत्नी धनश्रीला घटस्फोट देण्याच्या अफवांवर स्पष्टच बोलला चहल; म्हणाला, ‘आमच्या नात्यात दुरावा…’
भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे बोर्डाची चांदी, ३ वनडे सामन्यांतून कमावणार ‘इतके’ कोटी
धडाकेबाज पुनरागमनानंतर चाहरसाठी टी२० विश्वचषकाची दारे खुली? गोलंदाज म्हणतोय, ‘माझी निवड…’