---Advertisement---

आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक

---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळाडूंची कारकीर्द घडवण्यासाठी एक सामनाही पुरेसा ठरतो. असे अनेकदा झाले आहे की, एखाद्या खेळाडूने आयपीएलच्या एखाद्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आणि त्या खेळाडूला भविष्यात चांगल्या संधी मिळाल्या आहेत. असेच काही बुधवारी (०६ऑक्टोबर) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यात पाहायला मिळाले आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आणि सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.

उमरान मलिकने यावर्षी त्याचे आयपीएलमधील पदार्पण केले आहे. आयपीएलमधील पहिल्या सामना त्याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळला होता, पण त्याने या सामन्यात एकही विकेट घेता आला नव्हता. असे असले तरी, त्याच्या चेंडूच्या गतीमुळे हैराबादचा कर्णधार केन विलियम्सन प्रभावित झाला होता. विलियम्सनने त्यावेळी उमरानचे कौतुकही केले होते. याचा पार्श्वभूमीवर त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही संधी दिली गेली. उमरानने त्याच्या दुसऱ्या सामन्यातील चार षटकांमध्ये २१ धावा दिल्या आणि एक विकेटही मिळवला आहे. तसेच त्याने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रमही केला आहे.

उमरान ठरला आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज
उमरानने आरसीबीविरुद्धच्या  सामन्यात त्याच्या पहिल्याच षटाकात फलंदाजांना हैराण केले होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू त्याने १४७ किमीच्या वेगाने फेकला होता. त्यानंतर त्याच षटकातील चौथा चेंडू त्याने १५३ किमीच्या वेगाने टाकला आणि आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा मान मिळवला आहे. उमरानने वेगवान चेंडू फेकण्याच्या बाबतीत केकेआरच्या लॉकी फर्ग्यूसनला मागे सोडले आहे. लॉकी फर्ग्यूसनने याआधी १५२.७५ किमीच्या वेगाने चेंडू टाकलेला होता. आयपीएल कारकिर्दीतल केएस भरत उमरानचा पहिला बळी ठरला आहे.

कोण आहे उमरान मलिक?
उमरानचा जन्म २२ नोव्हेंबर १९९९ मध्ये श्रीनगरमध्ये झाला होता. तो जम्मू कश्मीर संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. तसेच त्याने यावर्षी त्याच्या राज्यासाठी पहिला टी२० सामना रेल्वेच्या संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात उमरानने २४ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या होत्या.  त्यानंतर त्याने १ लिस्ट ए सामना खेळला, ज्यामध्ये १ विकेट घेतला. तसेच ३ टी२० सामने खेळले, ज्यामध्ये ४ विकेट्स घेतले आहेत.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात उमरानच्या वेगवान गोलंदाजीमुळे भारतीय आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सामना संपल्यानंतर विराटने उमरानच्या जर्सीवर आणि चेंडूवर स्वत:ची स्वाक्षरी दिली आणि त्याचे कौतुकही केले आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनही उमरानच्या कामगिरीमुळे आनंदी झाला होता आणि त्यानेही उमरानचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटच्या आरसीबीचे ‘टॉप-२’मध्ये जाण्याचे स्वप्न स्वप्नचं राहिले, पण धोनी-पंतला विशेष फायदा

वयाच्या ४६व्या वर्षी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे मैदानावर पुनरागमन; गोलंदाजी पाहून म्हणाल, अजूनही सर्व तसंच आहे!

उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---