येत्या 11 जूलैपासून भारत अ संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 वनडे सामन्यांच्या मालिकेपासून होणार आहे. पण हा दौरा सुरु होण्याआधीच भारत अ संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्याला कोणती दुखापत आहे, याबद्दल बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण तो सध्या बंगळूरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यासाठी आता त्याच्याऐवजी भारत अ संघात महाराष्ट्राचा 20 वर्षीय सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे.
ऋतुराजने मागील महिन्यात श्रीलंका अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्याने श्रीलंका अ विरुद्ध भारत अ संघात झालेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 4 डावात 470 धावा केल्या होत्या.
याबरोबरच या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आधी मयंक अगरवाल आणि रिषभ पंत यांच्या नावाचाही भारत अ संघात समावेश होता. परंतू या दोघांचाही विश्वचषकासाठी वरिष्ठ भारतीय संघात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या ऐवजी भारत अ संघात अनमोलप्रीत सिंग आणि इशान किशन यांना संधी मिळाली आहे.
अनमोलप्रीत आणि किशन हे दोघेही मागील काही दिवसांपासून भारत अ संघाचे सदस्य आहेत आणि श्रीलंका अ संघाविरुद्धही ते मागील महिन्यात खेळले होते. श्रीलंका अ विरुद्ध झालेल्या 2 चार दिवसीय सामन्यात अनमोलप्रीतने भारत अ कडून चांगली कामगिरी करताना 3 डावात 241 धावा केल्या होत्या.
विंडीज अ विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 असा आहे भारत अ संघ –
मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पंड्या, दीपक चहर, खलील अहमद, अवेश खान, नवदीप सैनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू
–अष्टपैलू रविंद्र जडेजाने संजय मांजरेकरांना दिले असे चोख प्रतिउत्तर





