भारतीय क्रिकेट संघ मागील काही काळापासून प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात साखळी फेरीनंतर प्रमुख रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्याच्या दुखापतीबाबत एक महत्त्वाचे अपडेट येत असून, तो पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही सहभागी न होण्याची शक्यता वाढली आहे. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, जडेजावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे त्याला बराच काळ भारतीय संघ बाहेर राहावे लागू शकते.
रवींद्र जडेजा सध्या भारतीय संघासह आशिया चषक खेळत होता. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने ३५ धावा करून भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला. तर, हॉंगकॉंगविरूद्ध दुसऱ्या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करताना एक बळी मिळवलेला. अशा स्थितीत एका प्रमुख अष्टपैलू खेळाडूची अनुपस्थिती रोहित शर्माच्या संघासाठी मोठा धक्का असेल.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दुखापत काहीशी गंभीर स्वरूपाची असल्याने, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. यामुळे ही शक्यता वाढली आहे की, भारतीय संघाला आगामी टी20 विश्वचषकात त्याची सेवा मिळणार नाही. तो केव्हा पुनरागमान करेल याबाबत कोणताही अंदाज लावता येणार नाही.’
जडेजा मागील टी20 विश्वचषकानंतर अत्यंत कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. विश्वचषकानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने थेट आयपीएलमधून पुनरागमन केलेले. मात्र, आयपीएलमध्येही त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो केवळ इंग्लंड व वेस्ट इंडीजमध्ये संघाचा भाग होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मिचेल स्टार्कने टाकला ‘तो’ चेंडू आणि पाकिस्तानच्या दिग्गजाचा 23 वर्ष जुना विक्रम मोडीत
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
अखेर वाद निवळला! दुखापतग्रस्त जड्डूसाठी सीएसकेने केले खास ट्विट