---Advertisement---

टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

On: सोमवार, फेब्रुवारी 3, 2020 4:05 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका नुकतीच रविवारी(2 फेब्रुवारी) संपली. आता बुधवारपासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होईल.

मात्र भारताला वनडे मालिका सुरु होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा वनडे आणि कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला असल्याची शक्यता आहे.

रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात फलंदाजी करताना रोहितच्या पोटरीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे तो 60 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर त्याने या सामन्यात क्षेत्ररक्षणही केले नाही.

आता त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली की रोहित दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 

पण अजून बीसीसीआयने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 4 सामन्यात 46.67 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 140 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---