एशिया कपमधील सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरूद्ध मिळवला असला तरी त्यांच्या आनंदावर शाकिबच्या दुखापतीने विरजन पडले आहे.
पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात जखमी शाकिबला विश्रांती देण्यात आली होती.त्याच्या हाताच्या बाेटाला वेदना जाणवल्याची त्याने तक्रार केली होती. 28 सप्टेंबरला भारतासोबत होणाऱ्या अंतिम सामन्यासाठीही तो मुकणार आहे.
बांग्लादेशच्या संघाने मागील चार एशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असला तरी त्यांची दोन मुख्य खेळाडू तमिम इक्बाल आणि शाकिब-उल-हसन स्पर्धेबाहेर झाल्याने ते भारताचे आव्हान कश्याप्रकारे पेलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शाकिबच्या बोटाला झालेल्या दुखापती गंभीररूप धारण केले असून त्याच्यावर सर्जरी करणे आवश्यक असल्याचे संघाचे व्यवस्थापक खालेल मोहमुद यांनी एएफपीशी बोलताना सांगितले. तसेच त्याला लवकरात लवकर उपचरासाठी अमेरीकेला पाठवण्यात येणार आहे.
त्याला स्पर्धेआधी सर्जरी करणे आवश्यक होते. तरीही त्याला संघात स्थान देण्यात आले. तो पहिल्या चार सामन्यात खेळला. त्याने त्यात 49 धावा करत 7 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट
-कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो