भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीग खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. ऑस्ट्रेलियन माजी दिग्गज कर्णधार इयान चॅपल यांच्या मते जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत खेळत नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे भारतापेक्षा जड आहे.
जयसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यासह श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनाही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. इयान चॅपल खासकरून बुमराह आणि पंतचे नाव घेत भारतीय संघाला या दोघांची कमी जाणवेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांची दुखापत भारतीय संघावर प्रभाव टाकणारी ठरू शकते. कारण हे दोन्ही खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकत होते.”
इयान चॅपल (Ian Chappell) यांच्या मते भारताचे बहुतांश खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. अशात आयपीएलनंतर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर या खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. कारण आयपीएलमुळे खेळाडूंच्या प्रदर्शनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. “भविष्यवाणी करण्यासाठी हा सामना कठीण आहे. खेळाडूंच्या दुखापती आणि वर्षाच्या सुरुवातील खेळल्या गेलेल्या काही मालिकांनंतर (आयपीएल) दोन्ही संघांपैकी कुणीच कसोटी क्रिकेट खेळले नाहीये. यापैकी अनेक खेळाडू या अंतिम सामन्याआधी फक्त आयपीएल खेळले आहेत.”
“डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी ही बाब चांगली नाहीये. पण इंग्लंडचे माजी फलंदाज रवि बोपारा यांच्या सल्ला लक्षात घेतला पाहिजे. 2009 मध्ये बोपारा यांनी आयपीएल खेळल्यानंतर वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिका खेळली होती. टी-20 खेळल्यानंतर त्यांच्या पायाची हालचार चांगली आहे असे तांचे मत होते. सोबतच मानसिकताही सकारात्मक होती.” बोपारांनी या मालिकेत इंग्लंडसाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. अशात यावेळी असे काही होते का, यावर जाणकारांचे लक्ष असेल.
चॅपल पुढे असेही म्हणाले की, भारताच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज या सामन्यात अधिक प्रभाव टाकती. “जर पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोस हेजलवूड हे ऑस्ट्रेलियाचे शर्वोत्तम वेगवान गोलंदाजी अंतिम सामन्यासाठी उपलब्ध आहेत. अशात त्यांचा विजयासाठी थोटे प्रबळ दावेदार मानता येऊ शकते. कोणत्याही वेळी ते चांगले प्रदर्शन करू शकतात. पण खासकरून जूनमध्ये इंग्लंडमधील परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्या उपस्थितीत भारताचा वेगवान गोलंदाजी विभागही मजबूत आहे. भारतीय गोलंदाज याठिकाणी विकेट्सही घेऊ शकतात. पण ऑस्ट्रेलियन त्रिकूटापेक्षा ते मागेच दिसतात.” (Injuries to Jasprit Bumrah and Rishabh Pant will cost India in WTC final, says Ian Chappell)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना झालेल्या वादात 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बझबॉलच्या जोरावर इंग्लंड ऍशेस जिंकणार? ऑस्ट्रेलियन संघाला अँडरनसचे खुले आव्हान