---Advertisement---

संजू सॅमनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, एनसीएत कसून सराव करताना दिसला यष्टीरक्षक फलंदाज

Sanju Samson
---Advertisement---

संजू सॅमसन भारतीय संघासाठी 2015 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. सॅमसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सॅमसन केरळ संघासाठी खेळतो आणि या संघासोबत त्याची आकडेवारी अप्रतिम राहिली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सॅमसन कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांकडून खेळला आहे. भारतीय संघाचा हा यष्टीरक्षक फलंदाज दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीये. पण त्याच्या फिटनेसविषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

भारतीय संघ 2023 च्या सुरुवातील श्रीलंकन संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. श्रालंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) भारतासाठी खेळला, पण अवघ्या 5 धावा करून बाद झाला. या सामन्यात सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे समोर आले. या सामन्यानंतर बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने सॅमसनला विश्रांतीचा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर सॅमसनच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा (Jitesh Sharma) याला संघात समावेश करण्यात आला होता.

दुखापतीनंतकर सुमारे 20 दिवसांनी तो मैदानात परतण्यासाठी तयार दिसत आहे. सॅमसनच्या एका फॅन पेजवरून व्हिडिओ पोस्ट गेला गेला आहे, ज्यामध्ये तो एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) मध्ये त्याच्या फिटनेसवर काम करताना दिसत आहे. दुखापतीनंतर काही  दिवस एनसीएमध्ये फिटनेसवर काम केल्यानंतरसॅमसन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये संजू सॅमसन सराव करताना दिसत आहे.

असे असले तरी, संजू सॅमसन आयपीएलपूर्वी टीम इंडियासाठी एखादा सामना खेळेल, अशी शक्यता फारच कमी आहे. कारण तो वनडे आणि कसोटी संघाचा भाग नाहीये. सॅमसन खेळत असलेल्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला जास्त सामने खेळायचे नाहीत. तसेच संघात स्थान मिळवण्यासाठी सॅमसनसमोर असलेली स्पर्धा देखील मोठी आहे. रिषभ पंत अपघातानंतर संघातून बाहेर आहे. पण तरीदेखील ईशान किशन आणि केएल राहुलसारखे उत्कृष्ट यष्टिरक्षक संघाकडे उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता सॅमसन आगामी काही महिन्यांमध्ये भारताच्या जर्सीत दिसण्याची शक्यात कमीच दिसते. (Injury Update Indian wicket keeper Sanju Samson NCA Working On fitness viral video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ संघाबाहेरच, कर्णधार हार्दिक पंड्याकडून मिळाली प्लेइंग इलेव्हनविषयी माहिती
‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’…क्रिकेटमधील जय वीरुची मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---